मुंबई : पर्यटनासाठी गेलेले नागरिक घरी परत येत आहेत. त्यांच्यामार्फत पुढील काही दिवस करोना संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे ताप, सर्दी, खोकला इत्यादी लक्षणे असणाऱ्या व्यक्तींची करोना चाचणी करण्यात यावी अशा सूचना राज्य करोना कृती दलाकडून देण्यात आल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील काही दिवसांपासून करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मात्र रुग्णांमध्ये सौम्य स्वरुपाची लक्षणे आढळून येत आहेत. रुग्णालयात भरती होण्याच्या प्रमाणही कमी असून, मृत्यूच्या संख्येतही वाढ झालेली नाही. मात्र नाताळ तसेच नवीन वर्षानिमित्त सुट्टी घेऊन पर्यटनासाठी गेलेले नागरीक घरी परतले आहेत. त्यांच्यामार्फत करोना परसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे असणाऱ्या व्यक्तींची करोना चाचणी करावी. तसेच बाधित आढळल्यास त्यांच्या सतत संपर्कात येणाऱ्या व्यक्तींचीही करोना चाचणी करण्यात यावी, अशी सूचना राज्य करोना कृतीदलाचे अध्यक्ष डॉ. रमण गंगाखेडकर यांनी सर्व रुग्णालयांसह नागरिकांना दिल्या आहेत.

हेही वाचा : उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा! “ही वेळ मान-पान पाहण्याची नाही, २२ जानेवारीला आम्ही…”

करोना बाधित व्यक्तींना नजीकच्या रुग्णालयात उपचारसाठी न्यावे, रुग्णालयात भरती करण्याची आवश्यकता नसल्यास ५ दिवस शक्यतो गृहविलगीकरणात ठेवावे. तसेच शक्यतो खिडक्या बंद न करता घरात हवा खेळती राहील याची नागरिकांनी काळजी घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत.

लक्षणे असणाऱ्यांनी मुखपट्टी वापरा

करोना लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी इतरांना संसर्ग होऊ नये यासाठी मुखपट्टी वापरावी. करोना बाधित व्यक्तींनी इतरांमध्ये मिसळणे टाळावे. अतिजोखमीच्या व्यक्तींनी करोना लक्षणे असणाऱ्या व्यक्तींचा संपर्क शक्यतो टाळावा अथवा संपर्कादरम्यान मुखपट्टीचा वापर करण्याचा सल्लाही राज्य करोना कृती दलाचे अध्यक्ष डॉ. रमण गंगाखेडकर यांनी दिला.

हेही वाचा : लहान मुलांच्या पित्तनलिकेतील अडथळे दूर करणे होणार सोपे, मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात प्रथमच सुविधा

लक्षणे असल्यास प्राधान्याने चाचणी करा

रॅपिड अंटिजेन चाचणीनुसार बाधित आढळल्यास लक्षणानुसार उपचार करण्यात यावे. लक्षणे असून रॅपिड अँटिजेन चाचणी नकारात्मक असल्यास अशा रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.