उच्च न्यायालयाने फटकारूनही भाजपने महाराष्ट्र दिनानिमित्त शहरभर पक्षाचे हजारो झेंडे लावले असून शिवसेना भवन, हुतात्मा चौक परिसराला तर झेंडय़ांनी वेढले आहे. शिवसेनेने हुतात्मा चौकासह शहरातील काही भागांत भगवे झेंडे लावून व अखंड महाराष्ट्राचे फलक लावून प्रत्युत्तर दिले आहे. झेंडे, फलक लावून शहर विद्रूप न करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने देऊनही आगामी महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर झेंडायुद्ध रंगलेआहे.
शिवसेनेने दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्र दिनानिमित्त शहरात साडेतीनशेहून अधिक शाखांच्या परिसरात कार्यक्रम आयोजित केले आहेत. भाजपने मात्र महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर आणि शिवसेनेला शह देण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर महाराष्ट्र दिनाचे कार्यक्रम आयोजित केले. त्यानिमित्तानेभाजपने शहरात अनेक ठिकाणी झेंडे लावले असून दादरला शिवसेना भवन, हुतात्मा चौक, मरिन ड्राइव्ह आदी परिसरांत सर्वत्र भाजपचे झेंडे आहेत. विनापरवाना झेंडे, बॅनर्स, पोस्टर लावून शहर विद्रूप करू नये, असे उच्च न्यायालयाचे राजकीय पक्षांना आदेश आहेत. भाजप मुंबई अध्यक्ष अॅड. आशीष शेलार यांना न्यायालयाने फटकारलेही होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा