मुंबई : मी बंट समाजाच्या कार्यक्रमात आतापर्यंत अनेक वेळा आल्याने मला ‘देवेंद्र शेट्टी-फडणवीस’ म्हटले जात आहे. मला शेट्टी आडनाव लावायला आवडेल, त्यामुळे मुंबईतील दोन-चार हॉटेल्स तरी नावावर होतील, अशी मिश्कील टिप्पणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केली आणि सभागृहात एकच हशा पिकला. 

कुर्ला येथे विश्व बंट संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री फडणवीस, खासदार गोपाळ शेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी बोलताना फडणवीस म्हणाले, बंट समाज सर्व आघाडय़ांवर पुढे आहे. हा समाज जिथे जाईल, तिथे साखरेप्रमाणे मिसळतो. त्यांनी महाराष्ट्रात येऊन गोडवा वाढविला आहे. राज्य सरकार या समाजाबरोबर असून जेव्हा तुमची प्रगती होते, तेव्हा राज्याची व देशाचीही प्रगती होते.