मुंबई : केंद्र सरकारने पिवळ्या वाटाण्याच्या शुल्कमुक्त आयातीला फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिल्यामुळे बाजारात हरभऱ्याच्या दरात मोठी पडझड झाली आहे. गत हंगामात सात हजार रुपयांवर असलेले दर सध्या ६,५०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आले आहेत. मार्च, एप्रिलमध्ये नवीन हरभरा बाजारात आल्यानंतर दर आणखी कोसळण्याची भीती आहे.

केंद्र सरकारने हरभरा, तूर आणि बेसनचे (हरभरा पीठ) दर आवाक्यात राहण्यासाठी पहिल्यांदा डिसेंबर २०२४ पर्यंत पिवळ्या वाटाण्याच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी दिली होती, त्यात वाढ करून फेब्रुवारी २०२५ पर्यंत शुल्कमुक्त आयातीला मुदतवाढ दिली आहे. केंद्र सरकारने मुदतवाढ देण्यापूर्वी देशात २५ लाख टन पिवळ्या वाटाण्याची आयात झाली आहे. तर चालू रब्बी हंगामात देशात सुमारे सहा लाख टन पिवळा वाटाणा उत्पादीत होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पिवळा वाटाण्याच्या आयातीमुळे हरभरा दरावर दबाव निर्माण झाला आहे.

parbhani cotton production loksatta news
करोना काळात परभणीत वाढलेला कापूस यंदा घटला
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Sand Policy, Sand , Sand Auction, Scarcity ,
नागपूर : फसलेल्या वाळू धोरणाचे चटके, परराज्यातील वाळूचा पर्याय
Emphasis on exports of finished goods Prime Minister appeals for value addition of raw materials
तयार मालाच्या निर्यातीवर भर; कच्च्या मालाचे मूल्यवर्धन करण्याचे पंतप्रधानांचे आवाहन
Record daily collection of 1 crore 71 lakh liters of milk in the financial year
राज्यात दुधाचा ‘महापूर’; गत आर्थिक वर्षात १ कोटी ७१ लाख लिटरचे दैनंदिन विक्रमी संकलन
More than 17 deaths in two years at ammunition company
दारुगोळा कंपनीत दोन वर्षांत १७ हून अधिक बळी… भंडारातील घटनेमुळे…
low prices of tur in market
विश्लेषण : बाजारपेठेत तुरीच्या घसरणीमुळे शेतकऱ्यांशी कोंडी कशी?
radhakrishna vikhe patil statement on baramati district creation
बारामती स्वतंत्र जिल्हा निर्मितीची अफवा; राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती

हेही वाचा : परदेशी मालमत्ता व काळ्या पैशांच्या प्रकरणात ईडीकडून आठ कोटींच्या मालमत्तेवर टाच, पुण्यातील जमिनीचा सहभाग

गत दोन महिन्यांत हरभऱ्याचे दर वाढल्यानंतर देशातील व्यापाऱ्यांनी ऑस्ट्रेलियातून हरभरा आयातीचे करार करून ठेवले आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियातून सुमारे साडेसात लाख टन हरभरा आयात होण्याची शक्यता आहे. मार्च, एप्रिलमध्ये गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये रब्बी हंगामात उत्पादीत होणारा हरभरा बाजारात येण्यास सुरू होईल. यंदा पोषक हवामान असल्यामुळे सुमारे १२० लाख टन हरभरा उत्पादनाचा अंदाज आहे.

सध्या बाजारात हरभऱ्याची आवक कमी आहे, शिवाय ग्राहकही नाही. अशा अवस्थेत बाजार समित्यांममध्ये ५,२०० ते ५,८०० रुपये दर मिळत आहे. मार्च , एप्रिलमध्ये नवा हरभरा बाजारात आल्यानंतर दरात आणखी हजार रुपयांनी पडझड होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास ५६५० रुपये प्रति क्विंटल हमीभावापेक्षा कमी दराने शेतकऱ्यांना हरभरा विकावा लागण्याची शक्यता शेतीमाल बाजार व्यवस्थेचे अभ्यासक श्रीकांत कुवळेकर यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा : तीन दिवस बंद असलेले समीर ॲप पूर्ववत कार्यन्वित

पिवळ्या वाटाण्याची आयात का होते?

सध्या हरभऱ्याचे दर किरकोळ बाजारात ८० रुपये किलोवर आहेत, तर बेसन ९० रुपये किलोंवर आहे. पिवळा वाटाण्याचे पीठ पिवळे असते. पिवळा वाटाणा बाजारात ४० ते ४५ रुपये किलो दराने उपलब्ध आहे. बेसनचे दर कमी करण्यासाठी किंवा उत्पादन खर्चात कपात करण्यासाठी प्रक्रिया उद्योगात बेसनमध्ये (हरभरा पिठात) पिवळ्या वाटाण्याच्या पिठाची भेसळ केली जाते. उपहार गृहे, पाणीपुरी, मिसळसह घरगुती वापरातही अनेकदा हरभऱ्याला पर्याय म्हणून पिवळा वाटाणा वापरला जातो. पिवळ्या वाटाण्याच्या आयातीमुळे महागाईला काहिसा आळा बसतो. शिवाय खाद्य पदार्थ उद्योगालाही आयात सोयीची असते. त्यामुळे देशात पिवळ्या वाटाण्याची आयात केली जाते. पण, या आयातीमुळे हरभरा, तुरीच्या दरवर परिणाम होतो.

केंद्र सरकारकडे धाव

केंद्र सरकारने पिवळ्या वाटाण्याच्या शुल्कमुक्त आयातीला दोन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. मात्र, ही मुदतवाढ देशातील हरभरा उत्पादकांच्या अडचणीत वाढ करणारी आहे. शुल्कमुक्त आयातीच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी केंद्र आणि राज्य सरकारकडे केली आहे, अशी माहिती राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली.

Story img Loader