मुंबई : करोना लसीकरणात उत्तर प्रदेशने आघाडी घेतली असली तरी लशीच्या दोन्ही मात्रा देण्यात महाराष्ट्र देशात सर्वप्रथम आहे. उत्तर प्रदेशने आतापर्यंत पाच कोटी ५० लाख ४८ हजार इतके लसीकरण केले असून दोन्ही मात्रा देण्यात आलेल्या नागरिकांची संख्या ८६ लाख १८ हजार इतकी आहे. तर महाराष्ट्र लसीकरणात दुसऱ्या क्रमांकावर असून आतापर्यंत चार कोटी ७५ लाख इतके लसीकरण झाले आहे. मात्र दोन्ही मात्रा देण्यात महाराष्ट्र सर्वप्रथम असून एक कोटी २२ लाख नागरिकांना दोन्ही मात्रा देण्यात आल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

राज्यात ५,५६० नवे रुग्ण

मुंबई : राज्यात दिवसभरात ५५६० नव्या करोना रुग्णांची तर १६३ मृत्यूंची नोंद झाली. दिवसभरात ६९४४ जण करोनामुक्त झाले असून उपचाराधीन रुग्णांची संख्या ६४ हजार ५७० इतकी आहे. चोवीस तासांत मुंबईत २८५, रायगडमध्ये १३९, अहमदनगरात ८११, पुणे जिल्ह्यात ६६७, पुणे शहरात २८३, पिंपरी-चिंचवडमध्ये १९६, सोलापूरमध्ये ५९६, साताऱ्यात ५९४, कोल्हापूरमध्ये २७३, सांगलीत ४७४, रत्नागिरीत १५५, उस्मानाबादमध्ये १०१, बीडमध्ये ११३ इतकी नव्या रुग्णांची नोंद झाली.