स्कूलबसबाबतच्या निर्णयात नवीन काहीच नसून परिवहन विभागाशी चर्चा करून आधीच्या धोरणानुसारच तो घेतला गेला आहे. त्यामुळे त्यात आता कोणताही बदल होणार नाही, असे शालेय शिक्षण सचिव जे. एस. सहारिया यांनी ‘लोकसत्ता’ ला सांगितले. विद्यार्थ्यांनी स्कूलबसनेच शाळेत यावे, अशीच आमची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विशेष म्हणजे स्कूलबसबाबतचा हा निर्णय घेण्यापूर्वी शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्याशी विभागाने चर्चा केली नव्हती आणि त्यांच्याकडे याबाबतचा प्रस्तावही मंजुरीसाठी पाठविण्यात आला नसल्याचे समजते. मंत्र्यांना अंधारात ठेवून विभागाने परस्परच हा निर्णय घेतला आहे. अर्थात या निर्णयाविरोधात दर्डा यांनीही कोणतीही जाहीर भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे या निर्णयाला त्यांचाही विरोध नसल्याचा समज कायम आहे.
स्कूलबस नियमावर सरकार ठाम
स्कूलबसबाबतच्या निर्णयात नवीन काहीच नसून परिवहन विभागाशी चर्चा करून आधीच्या धोरणानुसारच तो घेतला गेला आहे.
First published on: 21-11-2013 at 03:10 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra government adamant on school bus guideline decision