मुंबई : राज्य शासनाने पुढील वर्षांतील म्हणजे २०२४ मधील सार्वजनिक सुट्टय़ांची यादी जाहीर केली आहे. पुढील वर्षांत विविध धार्मिक व राष्ट्रीय सणांच्या २४ व एक अतिरिक्त सुट्टी अशा एकूण २५ सुट्टय़ा जाहीर केल्या असून, त्यात शनिवार व रविवारला जोडून ९ सुट्टय़ा आल्याने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही खूशखबर असल्याचे मानले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> बावनकुळे यांची पंकजा मुंडेंशी चर्चा

नवीन वर्षांतील पहिलीच प्रजासत्ताक दिनाची २६ जानेवारीची सुट्टी शुक्रवारी आल्याने शनिवारी, रविवार अशा सलग तीन दिवस सुट्टय़ांचा लाभ शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. सोमवारी १९ फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीची सुट्टी आहे, त्याआधी शनिवार व रविवार सुट्टी असल्याने सलग तीन दिवस सुट्टय़ा मिळणार आहेत. महाशिवरात्री शुक्रवार (८ मार्च), होळी सोमवार ( २५ मार्च ), गुडफ्रायडे शुक्रवार ( २९ मार्च), बकरी ईद सोमवार (१७ जून), ईद ए मिलाद, सोमवार ( १६ सप्टेंबर), दिवाळी अमावास्या (लक्ष्मीपूजन) शुक्रवार (१ नोव्हेंबर ) आणि गुरुनानक जयंती शुक्रवार ( १५ नोव्हेंबर). या सुट्टय़ा शनिवार व रविवारला जोडून आल्याने सरकारी कर्मचाऱ्यांना सलग तीन दिवसांचा सुट्टय़ांचा लाभ मिळणार आहे. नवीन वर्षांतील पाच सुट्टय़ा शनिवारी व रविवारी आल्या आहेत. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महावीर जयंती, बकरी ईद, गणेश चतुर्थी, दसरा व दिवाळी बलिप्रतिपदा या सुटय़ांचा समावेश आहे. त्यामुळे या स्वंतत्र सुट्टय़ांचा लाभ कर्मचाऱ्यांना मिळणार नाही. राज्य शासनाने ३ नोव्हेंबरला भाऊबीजेची अतिरिक्त सुट्टी जाहीर केली आहे, परंतु त्या दिवशी रविवार असल्याने ती सुट्टीही स्वतंत्रपणे मिळणार नाही.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra government announced list of public holidays for years 2024 zws
Show comments