मंत्रालयात कामानिमित्त येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना आता प्रवेशासाठी रांगेत तिष्ठत उभे राहण्याची गरज भासणार नाही. ज्येष्ठ नागरिकांच्या मंत्रालय प्रवेशासाठी स्वतंत्र रांग सुरू करण्यात येणार आहे.
रोज हजारो अभ्यागत मंत्रालयात विविध कामांसाठी येतात. यामध्ये सर्वसामान्यांबरोबरच अपंग, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचाही मोठे प्रमाण असते. मंत्रालयात प्रवेश करतेवेळी अपंग व्यक्तींना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्यामुळे यापूर्वीच गृहमंत्री पाटील यांनी मंत्रालय प्रवेशाच्या वेळेआधी एक तास अगोदर, म्हणजे दुपारी १ नंतर अपंगांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता ज्येष्ठ नागरिकांनाही दिलासा देण्यात आला आहे. मंत्रालय प्रवेशासाठी ज्येष्ठ नागरिकांना रांगेत तिष्ठत राहावे लागू नये म्हणून त्यांच्यासाठी स्वतंत्र रांग सुरू करण्यात येणार आहे.

Story img Loader