मुंबई : करोनाच्या पुन्हा झालेल्या उद्रेकानंतर दक्षता म्हणून गर्दीच्या ठिकाणी मुखपट्टीचा वापर  करण्याचे व सुरक्षित अंतर ठेवण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे. तसेच सध्यातरी कोणतेही निर्बंध लागू केले जाणार नाही, असे स्पष्ट केले.  

राज्यातील करोना परिस्थिती पूर्ण नियंत्रणात असली तरी चीन, जपान, अमेरिका, ब्राझील या देशांमध्ये रुग्ण वाढताना दिसत आहेत. चीनमध्ये करोना विषाणूचा बीएफ.७ हा प्रकार अधिक वेगाने वाढताना आढळत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेत करोना परिस्थितीचा आढावा घेतला. राज्यातील जनुकीय क्रमनिर्धारण व्यवस्थेची माहिती आणि आढावाही यावेळी घेण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत आदी उपस्थित होते.

Strained US China Relations news in marathi
चीन अमेरिका संबंध आणखी बिघडणार?
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
cm devendra fadnavis prohibiting appointments of private secretaries in government offices
खासगी व्यक्तींच्या नियुक्तीस मनाई; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाने मंत्र्यांना धक्का
india exports contract 1 percent in december 2024
डिसेंबरमध्ये देशाच्या निर्यातीत घसरण; नेमके कारण काय?
PM Modi
PM Narendra Modi : “विस्तारवाद नाही, विकासवादाच्या भावनेने काम सुरू”, मुंबईत युद्धनौका आणि पाणबुडीचे उद्घाटन केल्यानंतर मोदींची प्रतिक्रिया
PM Narendra Modi to launch 2 warships and one submarine in Mumbai on Jan 15
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नौदलात एकाच दिवशी दोन युद्धनौका, एक पाणबुडी दाखल… भारताच्या युद्धसज्जतेत किती भर?
US China Relations , US China, Xi Jinping ,
चीनवर अमेरिकी निर्बंधांचा राजकीय परिणामही दिसेल…
Meta x gets rid of fact checkers
अग्रलेख : फेकुचंदांचा फाल्गुनोत्सव!

 जगातील करोनाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर राज्यात देखील खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन करतानाच सर्व पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यांमध्ये आरोग्य सुविधा सज्ज राहतील याची दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे मुख्य सचिवांनी देखील तातडीने सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून करोना अनुरूप वर्तन पंचसूत्रीचे काटेकोर पालन होईल, हे पाहण्याचे  आदेश  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  दिले.

पंचसूत्री राबविण्याचे आदेश

आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. संजय खंदारे यांनी करोना परिस्थितीबाबत सादरीकरण केले. राज्यात सध्या २२१६ करोना रुग्णालये असून १ लाख ३४ हजार विलगीकरण खाटा असल्याचे यावेळी सांगण्यात आले. चाचण्या, ट्रॅकिंग, उपचार, लसीकरण आणि करोना अनुरूप वर्तन अशी पंचसूत्री राबविण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. त्यानुसार सर्व जिल्ह्यांमध्ये पंचसूत्रीची अंमलबजावणी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.  या नव्या विषाणूची तीव्रता ओमीक्रॉनपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जात आहे.  मंत्रिमंडळाच्या बैठकीतही या विषयावर चर्चा झाली. तसेच करोनाच्या नव्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर चाचणी, पाठपुरावा, उपचार आणि लसीकरणावर भर देण्यात येईल. आरोग्य यंत्रणांनाही सतर्क राहण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.

Story img Loader