कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणाची चौकशी विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) करण्याचा निर्णय गुरूवारी राज्य सरकारने घेतला. पानसरे यांची हत्या होऊन दोन महिने उलटले तरी पोलीसांना या हत्येचा माग काढता आला नव्हता. त्यामुळेच सरकारने अखेर याप्रकरणाच्या एसआयटी नेमण्याचा निर्णय घेतला आहे. अप्पर महासंचालक संजय कुमार यांच्या नेतृत्वाखाली एसआयटीची स्थापन करण्यात आली असून या पथकात पुणे, मुंबई, कोल्हापूर या तीन ठिकाणच्या पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश असेल. येत्या बुधवारी कोल्हापूरात एसआयटीची पहिली बैठक होणार आहे. यापूर्वी पानसरे यांची मुलगी स्मिता आणि सून मेघा यांनी या प्रकरणात हस्तक्षेप अर्जाद्वारे हत्येचा तपास विशेष तपास पथकातर्फे (एसआयटी)करण्याची मागणी केली होती.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Apr 2015 रोजी प्रकाशित
कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी नेमण्याचा निर्णय
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणाची चौकशी विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) करण्याचा निर्णय गुरूवारी राज्य सरकारने घेतला.

First published on: 23-04-2015 at 09:37 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra government appointed sit govind pansare murder case