गुटख्यापाठोपाठ राज्य सरकारने मावा, जर्दा आणि खर्राच्या विक्रीवर राज्यात बंदी घातली. या पुढे केवळ तंबाखूच्या विक्रीला राज्यात परवानगी देण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनाने गेल्या वर्षी २० जुलैपासून गुटखा आणि पान मसाल्यावर राज्यात बंदी अमलात आणली. या बंदीमध्ये नुकतीच आणखी एक वर्षाची वाढ करण्यात आली. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी यासंदर्भात विधीमंडळात माहिती दिली. गुटखा आणि माव्याच्या सेवनामुळे तोंडातील कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले असल्यामुळे त्यावर बंदी घालण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.