मुंबई : ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चा डिसेंबर महिन्याचा लाभ देण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली. एकूण २ कोटी २३ लाख लाभार्थींपैकी ६७ लाख बहिणींना १५०० रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले. विधानसभा निवडणुकीमुळे नोव्हेंबरचे अनुदान ऑक्टोबरमध्ये वाटण्यात आले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डिसेंबर महिन्याचे पैसे देण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली. २ कोटी ३४ लाख लाडक्या बहिणींपैकी ६७ लाख बहिणींच्या खात्यात पहिल्या दिवशी रक्कम जमा झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत सर्व महिलांच्या खात्यात रक्कम जमा होईल, असे सांगण्यात आले.

हेही वाचा >>> गेटवे ऑफ इंडिया येथील जेट्टीच्या आधुनिकीकरणाचा मार्ग मोकळा

जुलै महिन्यापासून सुरू झालेल्या या योजनेसाठी राज्यातून २ कोटी ६३ लाख अर्ज आले होते. त्यापैकी २ कोटी ४७ लाख अर्ज पात्र ठरले. १२ लाख ८७ हजार बहिणींचे बँक खाते आधार कार्डशी जोडले गेले नव्हते. त्यांना निवडणुकीपूर्वी योजनेचा लाभ मिळाला नाही. दोन कोटी ३४ लाख बहिणींना ऑक्टोबर महिन्यात नोव्हेंबर पर्यंतचे प्रत्येकी १५०० हजार रुपये प्रमाणे साडेसात हजार रुपये बँक खात्यात जमा केले गेले होते. डिसेंबरचा लाभ देण्यासाठी एक हजार ४०० कोटी रुपयांची तरतूद केली. आदिती तटकरे यांच्याकडे महिला विकास विभाग कायम राहिल्याने त्यांनी शनिवारी खातेवाटप झाल्यानंतर डिसेंबर महिन्याचा लाभ देण्याच्या कामाला गती दिली.

१२ लाखांवर नवे लाभार्थी

आतापर्यंत एकदाही लाभ न मिळालेल्या १२ लाख ८७ हजार बहिणींना सहा महिन्यांचे एकूण नऊ हजार बँक खात्यात जमा करण्यात आले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत फायदा झाला. राज्यातील लाभार्थी बहिणींनी केलेल्या मतदानामुळे महायुतीला घवघवीत यश मिळाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra government deposited december money under ladki bahin scheme in 67 lakh women account mumbai print news zws