मुंबई : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित सहकारी साखर कारखान्यांच्या कर्जाला शासनाने थकहमी दिली आहे. चव्हाण यांच्या काखान्याला शासनाने मदत केल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जाते. राज्य शासनाने पाच सहकारी साखर कारखान्यांच्या कर्जाला थकहमी देण्याचा आदेश जारी केला. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे संस्थापक असलेल्या व त्यांच्या गटाची सत्ता असलेल्या भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या १४७ कोटी रुपयांच्या कर्जाला शासनाने थकहमी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> विचारांच्या मेळाव्यातून प्रचाराचे रणशिंग; दसऱ्यानिमित्त मुंबई, पुणे, बीडमध्ये राजकीय सभा

काँग्रेस नेते व मराठा आरक्षणाच्या मुद्दावर शिंदे सरकारवर टीका करीत असतानाही अशोक चव्हाण यांच्याशी संबंधित कारखान्याला शासनाने मदत केल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाची सत्ता असलेल्या इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना लि. भवानीनगर या साखर कारखान्याच्या १२८ कोटी रुपयांच्या कर्जाला सरकारने थकहमी दिली आहे या कारखान्याशी अजित पवार यांचा थेट संबंध नसला तरी त्यांच्या गटाची या कारखान्यात सत्ता आहे. काँग्रेस आणि भाजप असा राजकीय प्रवास केलेले माजी आमदार धनाजी साठे यांच्या माढा तालुक्यातील श्री संत कुर्मदास सहकारी साखर कारखान्याच्या ६० कोटीच्या कर्जाला सरकारने हमी दिली आहे. याशिवाय पंढरपूरमधील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना ( १४६ कोटी), बीड जिल्ह्यातील गेवराईच्या जयभवानी सहकारी साखर कारखाना (१५० कोटी) कर्जाला सरकारने थकहमी दिली आहे.