राज्यात मुलींची १४ वसतिगृहे सुरू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. प्रत्येक वसतिगृहाची प्रवेशक्षमता २२५० इतकी असेल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी दिली. मुलींच्या वसतिगृहांची कमतरता असल्याने प्रवेशासाठी अडचण होत होती. अर्जाची संख्या भरपूर असताना जागा उपलब्ध होत नव्हत्या. त्यामुळे नवीन वसतिगृहांची उभारणी करण्यात येणार असून त्यासाठी ७० कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.