मुंबई : श्रीमंत संघटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर (बीसीसीआय) राज्य सरकार मेहरबान झाले  आहे. क्रिकेट सामन्यांसाठी पुरवाव्या लागणाऱ्या पोलीस बंदोबस्ताच्या शुल्कात सरकारने  भरमसाट सवलत दिली आहे.

मुंबईप्रमाणे नवी मुंबई, नागपूर, पुणे या शहरांतील मैदानात क्रिकेटचे सामने आयोजित केले जातात. तेथेही ही सवलत लागू केली असून या बाबत गृह खात्याने आदेश काढला आहे. गृह खात्याने २०१९-२०२० ते २०२३-२४ या कालावधीसाठी क्रिकेट सामन्यासाठी शुल्काचे  नवीन दर लागू केले आहेत. यामध्ये सवलत देताना बीसीसीआयवर सवलतीचा वर्षांव केला आहे. मुंबई शहरातील मैदानावर सामने असतील तर बंदोबस्तासाठी टी-२० च्या एका सामन्यासाठी यापूर्वी ७० लाख इतके बंदोबस्त शुल्क आकारले जात होते.

High Court orders Mumbai Police regarding atrocity case against Nawab Malik Mumbai news
मलिक यांच्याविरोधातील ॲट्रोसिटी प्रकरणाचा तपास चार आठवड्यांत पूर्ण करा; उच्च न्यायालयाचे मुंबई पोलिसांना आदेश
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
mumbai 155 police inspectors transferred before assembly elections have returned
पोलीस निरीक्षक मुंबईत परतले, विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई बाहेर झाली होती बदली
loksatta readers response
लोकमानस : अदानी देशापेक्षा मोठे आहेत का?
State Government approved one time transfer for Community Health Officers under National Health Mission
आता समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्याही बदल्या होणार
Mumbai, gold, silver , Accused arrested with gold,
मुंबई : १९ कोटींच्या सोन्या, चांदीसह आरोपीला अटक
ICC Banned National Cricket League USA
एक चूक अन् ICCने ‘या’ लीगवर घातली बंदी, सचिन तेंडुलकर-गावस्करांशी आहे कनेक्शन
Why Siraj Get Heavier Penalty Than Head after Adelaide Controversy
Siraj-Head Fight: मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडपेक्षा ICCने जास्त शिक्षा का ठोठावली? काय आहे नेमकं कारण?

आता ते कमी केल्यामुळे मुंबई पोलिसांना एका सामन्यासाठी केवळ १० लाख रुपये मिळणार आहेत. केवळ एका सामन्यात ६० लाख रुपये इतक्या रकमेवर मुंबई पोलिसांना यापुढे पाणी सोडावे लागणार आहे. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी ७५ लाख रुपये इतके बंदोबस्तासाठी मिळत होते. या निर्णयाने यापुढे २५ लाख रुपये इतके शुल्क मुंबई पोलिसांना मिळणार आहे. तर पाच दिवसांच्या एका कसोटी सामन्यासाठी यापूर्वी ६० लाख रुपये शुल्क होते ते आता २५ लाख रुपये इतके कमी केले आहे. मुंबईप्रमाणे नागपूर, पुणे, नवी मुंबई येथील मैदानावर क्रिकेटचे सामने आयोजित केले जातात. ‘बीसीसीआय’च्या सचिवपदी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे पुत्र जय शाह तर खजिनदारपदी आशीष शेलार आहेत. मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष काळे हेसुद्धा भाजपशी संबंधित आहेत.

Story img Loader