पुणे : राज्यातील खासगी रुग्णालयांना जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन व हाताळणीच्या शुल्कात सरकारने बदल केला आहे. रुग्णालयांना भांडवली गुंतवणुकीऐवजी रुग्णशय्येच्या संख्येनुसार हे शुल्क द्यावे लागणार आहे. यामुळे राज्यातील हजारो रुग्णालयांना दिलासा मिळाला आहे.

खासगी रुग्णालयांना जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन आणि हाताळणीसाठी शुल्क आकारले जाते. हे शुल्क तीन वर्षांच्या कालावधीसाठी असते आणि ते महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे जमा करावे लागते. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने २०१६ पासून खासगी रुग्णालयांना हे शुल्क लागू केले. त्यामुळे हे शुल्क दर तीन वर्षांनी भरणे रुग्णालयांसाठी बंधनकारक आहे. सरकारने रुग्णालयांना त्यांच्या भांडवली गुंतवणुकीच्या तुलनेत हे शुल्क आकारण्यास सुरुवात केली. याला रुग्णालयांनी विरोध केला होता.

expectations from mahayuti
लेख : नव्या सरकारकडून अपेक्षा
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Health Department provided assistance to 2 5 lakh critically ill patients mumbai news
आरोग्य विभागाने अडीच लाख दुर्धर आजाराच्या रुग्णांना दिला मदतीचा हात! पॅलिएटीव्ह सेवेचा करणार विस्तार…
State Government approved one time transfer for Community Health Officers under National Health Mission
आता समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्याही बदल्या होणार
snake bites disease
सर्पदंश हा आजार मानला जाणार? कारण काय? याला अधिसूचित आजार घोषित करण्याची मागणी केंद्राकडून का होत आहे?
account wise inquiry started against clerk in case of corruption in Jijamata Hospital of Municipal Corporation in Pimpri
पिंपरी : जिजामाता रुग्णालयातील रकमेचा अपहार; लिपिकाची खातेनिहाय चौकशी
43 ministers maharashtra
विश्लेषण : महाराष्ट्रात ४३ मंत्रीच? मंत्रिमंडळात मंत्र्यांची संख्या किती असते? या संख्येवर बंधने का असतात?
Robotic assisted Surgery at Fortis Hospital
हृदयविकाराच्या रुग्णावर केली रोबोटिक गॉलब्लॅडर शस्त्रक्रिया!

हेही वाचा >>> प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त मध्यभागात वाहतूक बदल

इंडियन मेडिकल असोसिएशनची पुणे शाखा आणि हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाच्या पुणे शाखेने याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अविनाश ढाकणे यांच्याकडे मागणी केली होती. त्यात रुग्णालयांना जैव वैद्यकीय कचरा शुल्क भांडवली गुंतवणुकीच्या तुलनेत आकारण्याऐवजी रुग्णशय्येच्या आधारावर आकारावा, अशी मागणी करण्यात आली होती. अखेर सरकारने रुग्णशय्येचा आधारावर शुल्क आकारणी करण्याचा आदेश काढला आहे. यामुळे खासगी रुग्णालयांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा >>> Ganesh Chaturthi 2024 : गणेशोत्सवात कडक बंदोबस्त; उत्सवी गर्दीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन सुधारित शुल्क

रुग्णालयाची क्षमता – दर तीन वर्षांसाठी शुल्क (रुपयांत)

शून्य रुग्णशय्या – १ हजार

१ ते १० रुग्णशय्या – २ हजार

११ ते ५० रुग्णशय्या – ५ हजार

५१ ते १०० रुग्णशय्या – १५ हजार

१०१ ते ३०० रुग्णशय्या – ५० हजार

३०१ ते ५०० रुग्णशय्या – १ लाख

५०१ ते १ हजार रुग्णशय्या – २ लाख

१ हजारपेक्षा जास्त रुग्णशय्या – ५ लाख

प्रयोगशाळा, रक्तपेढी – ५ हजार

सरकारने रुग्णालयांना भांडवली गुंतवणुकीवर जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन शुल्क आधी आकारले होते. हे शुल्क जास्त असल्याने रुग्णालयांची कोंडी होत होती. आता हे शुल्क ९० टक्क्यांनी कमी झाल्याने रुग्णालयांना दिलासा मिळाला आहे. – डॉ. संजय पाटील, राष्ट्रीय सचिव, हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया

Story img Loader