ठाणे महापालिका आयुक्त आर. ए. राजीव यांच्यासह सात ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या सरकारने मंगळवारी बदल्या केल्या. त्यामुळे गेले काही महिने रखडलेल्या बदल्यांचा नारळ फुटला असला तरी गेल्या दीड महिन्यापासून रिक्त असलेल्या ठाणे महापालिका आयुक्तपदी अद्याप कोणाचीही नियुक्ती झालेली नाही.
गेले महिनाभर रजेवर असलेले राजीव यांची पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव म्हणून तर राधेश्याम मोपलवार यांची कोकण विभागीय आयुक्त म्हणून बदली झाली आहे. सरकारने काही दिवसांपूर्वी उत्तराखंड येथे अडकलेल्या पर्यटकांच्या मदतीसाठी राजीव यांना पाठविले होते. तेव्हा अतिरिक्त आयुक्त श्यामसुंदर पाटील यांच्याकडे आयुक्तपदाचा कार्यभार सोपविला होता. गेला आठवडाभर महापालिकेचा कारभार आयुक्ताविनाच सुरू होता. त्यामुळे या बदल्यांमध्ये तरी ठाणे आणि नवी मुंबई महापालिका आयुक्तपदाचा पेच सुटण्याची अपेक्षा होती. मात्र पुन्हा एकदा श्यामसुंदर पाटील यांच्याकडेच ठाणे महापालिकेचा कारभार सोपविण्यात आला आहे.
अश्वनी कुमार यांची विद्युत नियामक आयोगाचे सदस्य सचिवपदी, श्रीकांत देशपांडे यांची मंत्रालयात विशेष चौकशी अधिकारी पदावर, वल्सा नायर सिंह एममएमआरडीएच्या अतिरिक्त महानगर आयुक्तपदी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदी संतोष कुमार तर एम. एन केरकेट्टा यांची महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांचे प्रकल्प अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा