मॅगीवरील बंदी उठविण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात राज्य सरकार आता सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार आहे. राज्याच्या अन्य व औषध विभागाने घेतलेल्या या निर्णयाला केंद्र सरकारने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात मॅगीविरोधात याचिका दाखल करणार आहे.
शिसे आणि मोनोसोडियम ग्लुटामेट (एमएसजी) यांचे प्रमाण निर्धारित मात्रेपेक्षा जास्त आढळल्याने जूनमध्ये मॅगीच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली होती. या निर्णयाविरोधात मॅगीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावरील सुनावणी आणि मॅगीच्या विविध नमुन्यांच्या चाचण्यांच्या अहवालानंतर उच्च न्यायालयाने मॅगीच्या विक्रीवरील बंदी उठवली होती. या पार्श्वभूमीवर याच आठवड्यात स्नॅपडील या ऑनलाईन व्यवस्थेद्वारे मॅगीच्या विक्रीला पुन्हा सुरुवातही झाली.
आता राज्य सरकारने मॅगीबंदीचा निर्णय कायम ठेवावा, या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. मॅगीवर पुन्हा बंदी घालावी, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात येणार आहे. राज्यातील अन्न व औषध विभागाने हा निर्णय घेतला आहे. त्याला केंद्र सरकारने पाठिंबा दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा