मुंबई : दहीहंडी उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे. मुंबईसह राज्यात ठिकठिकाणची गोविंदा पथके रात्री जागून मानवी मनोरे रचण्याचा सराव करीत आहेत. या पार्श्वभूमीवर वरळीतील एनएससीआय डोम येथे महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या ‘प्रो – गोविंदा’ स्पर्धेचा थरार गुरुवारी उपस्थितांनी अनुभवला.

‘प्रो – गोविंदा’ स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी सर्व दहीहंडी प्रेमींना नि:शुल्क प्रवेश देण्यात आला होता. क्षणार्धात मानवी मनोरे रचण्याचा गोविंदा पथकांचा थरार अनुभवण्यासाठी सायंकाळी चार वाजल्यापासूनच एनएससीआय डोम येथे अनेकांनी गर्दी केली होती. सर्व गोविंदा पथक कसून सराव करून स्पर्धेत सहभागी झाले होते. आपापल्या गोविंदा पथकांचा उत्साह व जोश वाढविण्यासाठी समर्थक ‘गोविंदा रे गोपाळा’, ‘बोल बजरंग बली की जय’चा गजर करीत होते. त्याचसोबत विविध गाण्यांवर ठेका धरीत होते. या स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अभिनेते अभिषेक बच्चन, खासदार राहुल शेवाळे, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आदी राजकीय व मनोरंजन क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. ढोल – ताशांच्या गजरात आणि मराठमोळय़ा नृत्यांचे सादरीकरण करून ‘प्रो – गोविंदा’ स्पर्धेच्या अंतिम फेरीचे उद्घाटन पार पडले.

Seizure and attachment action against 3000 properties for non-payment of property tax
मालमत्ता कर न भरणाऱ्या ३ हजार मालमत्तांवर जप्ती व अटकावणीची कारवाई, २१८ कोटी ९६ लाखांची थकबाकी वसूल
MNS candidate Rajesh Yerunkar from Dahisar questions the reliability of EVMs
मला आई आणि बायकोनेही मतदान केले नाही का?…
ED takes major action against Fairplay app for online betting on elections
निवडणुकांवर ऑनलाईन सट्टेबाजी करणाऱ्या फेअरप्ले ॲपशी संबंधीत ईडीची मोठी कारवाई
Metro 3 Series of technical problems continue on Aarey-BKC route
मेट्रो ३ : आरे – बीकेसी मार्गिकेवर तांत्रिक अडचणींची मालिका सुरूच
Milk procurement price reduced by Rs 3 per liter big hit to milk producers
निवडणूक रणधुमाळी संपताच शेतकऱ्यांना पहिला दणका; जाणून घ्या, गायीच्या दूध खरेदी दरातील नेमका बदल
Kanpur-LTT superfast express delayed by 9 hours
अतिरिक्त पैसे मोजूनही विलंब यातना, कानपूर-एलटीटी अतिजलद एक्स्प्रेसला तब्बल ९ तास विलंब
Extension of deadline for applications for increase in seats in postgraduate medical courses
पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या जागा वाढीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
MHADAs Konkan Mandal lottery postponed
म्हाडाच्या कोकण मंडळाची सोडत लांबणीवर, अर्ज विक्री-स्वीकृतीला प्रतिसादच न मिळाल्याने मुदतवाढी देण्याची नामुष्की

हेही वाचा >>> राज्य बँक घोटाळा : आरोपपत्रातून अजित पवारांचे नाव वगळले? ‘ईडी’च्या पुरवणी आरोपपत्रात १४ नावांचा समावेश

‘प्रो – गोविंदा’ या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतून एकूण १४ गोविंदा पथक अंतिम फेरीत दाखल झाले होते. आर्यन्स गोविंदा पथक विरुद्ध खोपटचा राजा गोविंदा पथक, विघ्नहर्ता गोविंदा पथक विरुद्ध ओम ब्रम्हांड गोविंदा पथक, कोकण नगर गोविंदा पथक विरुद्ध यश गोविंदा पथक, हिंदूू एकता गोविंदा पथक विरुद्ध बालवीर गोविंदा पथक, शिव साई गोविंदा पथक विरुद्ध किसन नगरचा राजा गोविंदा पथक, अष्टविनायक गोविंदा पथक विरुद्ध श्री अष्टविनायक गोविंदा पथक, जय जवान गोविंदा पथक विरुद्ध साई राम गोविंदा पथक असे सामने अंतिम फेरीत रंगले होते. 

लाखो रुपयांच्या बक्षिसांची खैरात ‘प्रो – गोविंदा’ या स्पर्धेतील विजेत्या गोविंदा पथकाला ११ लाख रुपये, उपविजेत्या गोविंदा पथकाला ७ लाख रुपये आणि तृतीय स्थान पटकावलेल्या गोविंदा पथकासाठी ५ लाख रुपयांचे व चौथे स्थान पटकावलेल्या गोविंदा पथकासाठी ३ लाख रुपयांचे पारितोषिक होते. तर या स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक गोविंदाचा राज्य शासनाकडून विमा काढण्यात आला आहे.