विनोदाच्या नावाखाली अश्लीलता आणि बिभत्सपणाचे दर्शन घडविणाऱ्या ‘एआयबी नॉक आऊट’ या कार्यक्रमाचा व्हिडीओ युटय़ुबवर अपलोड झाल्यानंतर त्याचे पडसाद उमटले आहेत. कार्यक्रमात अतिशय अश्लिल आणि कमरेखालचे विनोद असून महाराष्ट्रातल्या सुसंस्कृत घरात हा कार्यक्रम पाहिलाच जाऊ शकत नाही, असं सांगत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ‘एआयबी नॉकआऊट’ कार्यक्रम बंद करण्याची मागणी केली आहे. तसेच कार्यक्रमावर बंदी न घातल्यास कायदा हातात घेऊन आम्हीच कार्यक्रम बंद पाडू, असा इशारा देखील आव्हाड यांनी दिला आहे. तर, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी या कार्यक्रमास परवानगी होती का, ते पडताळण्यासाठी चौकशी केली जाणार असल्याचे सांगितले. मात्र, या कार्यक्रमाला नियमानुसार परवानगी मिळाली असेल, तर हा कार्यक्रम रोखता येणार नसल्याचे थेट आणि स्पष्ट मत देखील तावडे यांनी ट्विटरवर व्यक्त केले आहे.
काय आहे एआयबी नॉक आऊट?
यूटय़ूब चॅनलवर कुणीही आपले व्हिडीओ अपलोड करू शकतात. तन्मय भट, गुरसिमरन खांबा, रोहन जोशी, अबिश मॅथ्यू हे अशाच पद्धतीने यु टयुबवर चॅनलवर विनोदी व्हिडियो टाकत असतात. २० डिसेंबर रोजी वरळीत त्यांनी मुंबईत एक धर्मदाय कार्यक्रम आयोजित केला होता. एआयबी नॉकआऊट असे या कार्यक्रमाचे नाव होते. अभिनेते अर्जुन कपूर आणि रणवीर सिंग या कार्यक्रमात होते तर दिग्दर्शक करण जोहर परीक्षकाच्या भूमिकेत होता. या कार्यक्रमात दीपिका पदुकोण, सोनाक्षी सिन्हा, आलिया भट आदी सिनेकलावंतांची उपस्थिती होती. या शो मध्ये अक्षरश अश्लील शब्दांचा भडीमार करण्यात आलेला होता. या कार्यक्रमाचे तिकीट प्रत्येकी ४ हजार रुपये होते आणि त्यांना ४० लाखांचा निधी मिळाला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा