मुंबईः राज्यातील १६ उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश मंगळवारी गृह विभागाकडून देण्यात आले. मुंबईच्या गुन्हे शाखेचे उपायुक्त दत्ता नलावडे यांची मुंबई रेल्वे पोलीस उपायुक्त पदी बदली करण्यात आली आहे. मुंबईतील वाहतुक विभागातील उपायुक्त राजू भुजबळ यांचीही मुख्य सुरक्षा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय येथे बदली करण्यात आली आहे. याशिवाय मुंबई रेल्वे उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांची राज्य गुप्तवार्ता विभाग, नागपूर येथे बदली करण्यात आली आहे.
हेही वाचा : Ganeshotsav 2024 Google Maps: यंदा गणेशोत्सवातील कृत्रिम तलावांची यादी गुगल मॅपवर !
महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालय येथील सुरक्षा अधिकारी प्रदीप चव्हाण यांची मुंबईत उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे. याशिवाय नवी मुंबईतील उपायुक्त विवेक पानसरे यांची मुंबईत उपायुक्त म्हणून बदली करण्यता आली आहे. याशिवाय रश्मी नांदेडकर यांची नवी मुंबई उपायुक्तपदी, मीना मकवाणा यांची ठाणे उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे. याशिवाय इतरही उपायुक्तासह एकूण १६ उपायुक्तांच्या बदलीचे आदेश मंगळवारी देण्यात आले आहे.