आघाडीने केलेल्या विकासकामांमुळेच महाराष्ट्र देशात पहिला आहे, असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. विधानसभा निवडणुकांच्या तारखा शुक्रवारी जाहीर झाल्यानंतर लागलीच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेतली आणि आघाडीने केलेल्या कामाच्या जोरावरच लोकांसमोर जाऊ आणि जनता पुन्हा एकदा आम्हाला निवडून देूईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
लोकसभेतील दारूण पराभवानंतर पक्षाला संजीवनी देणे हे मोठे आव्हान असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राष्ट्रवादीसोबत आघाडीची चर्चा सुरू असून निवडणुकीचा जाहीरनामा लवकरच लोकांसमोर मांडला जाईल. राज्यात आरोग्य, शिक्षण आणि महिलांची सुरक्षा यांसारख्या प्रश्नाकडे यापुढील काळात अधिक लक्ष दिले जाईल. तसेच राज्यात कुणीही उपाशी राहणार नाही, याची काळजी घेणार असल्याचंही ते पुढे म्हणाले.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणारे पक्षबदल, पक्षातील गटबाजी आणि कुरघोडीच्या राजकारणावर शिकस्त करावी लागेल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा