मुंबई : बेळगावमधील हिरे बागेवाडी टोल नाक्याजवळ कन्नड संघटनांकडून महाराष्ट्रातील ट्रकवर दगडफेक करण्यात आली. या आंदोलनाचा एसटीच्या सेवांवरही परिणाम झाला. महाराष्ट्रातील विविध भागांतून कर्नाटकात जाणाऱ्या आणि येणाऱ्या १४५ एसटी फेऱ्या मंगळवारी रद्द करण्यात आल्या. कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी यांसह अन्य काही जिल्ह्यांतून कर्नाटकसाठी दररोज ३३० एसटी फेऱ्या होतात. तेवढय़ाच फेऱ्या पुन्हा कर्नाटककडे रवाना होतात. कन्नड संघटनांकडून करण्यात आलेल्या आंदोलनामुळे एसटीच्या वाहतुकीवर परिणाम झाला. एकूण १४५ एसटी फेऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या परिवहन सेवाही थांबवण्यात आल्या आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा