मुंबई : काँग्रेसचे सत्यजित तांबे यांची बंडखोरी, त्यातून काँग्रेसवर आलेली नामुष्की, भाजप, काँग्रेस आणि शिवसेनेला आयात करावे लागलेले उमेदवार अशा अनेक घडामोडींमुळे चर्चेत आलेल्या विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर अशा पाच मतदारसंघांमध्ये आज, सोमवारी मतदान होत आहे. प्रथमच चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी होणार आहे.  

सध्या महाविकास आघाडीचे संख्याबळ तीन, तर भाजपचे दोन असे आहे. महाविकास आघाडी आपले संख्याबळ कायम राखणार की भाजप मुसंडी मारणार याची उत्सुकता या निवडणुकीत आहे. निवडणुकीच्या निमित्ताने सरकारी कर्मचाऱ्यांकरिता जुनी निवृत्तिवेतन योजना पुन्हा लागू करण्याचा मुद्दा केंद्रस्थानी आला. या निवडणुकीत राजकारणच अधिक झाले. शिक्षक मतदारसंघात शिक्षकांच्या प्रश्नांपेक्षा राजकीय चर्चाच अधिक रंगली. विधान परिषदेच्या कोकण, नागपूर आणि औरंगाबाद शिक्षक तर नाशिक आणि अमरावती पदवीधर मतदारसंघांमध्ये सोमवारी मतदान होईल. एरवी शिक्षक तसेच पदवीधर मतदारसंघांमधील निवडणूक फारशी चर्चेत नसते. मात्र यंदा काँग्रेसचे सत्यजित तांबे यांच्या बंडखोरीमुळे ती अधिक चर्चेत आली. 

Ashok Uike, Vasant Purke
राळेगावमध्ये भाजपचा अतिआत्मविश्वास काँग्रेसच्या पथ्यावर ! दोन माजी मंत्र्यांमध्ये थेट लढत
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
On Friday Rahul Gandhi spoke with Prakash Ambedkar he said he will campaign against his candidate
‘तुमच्या उमेदवाराच्या…’ॲड. प्रकाश आंबेडकर व राहुल गांधींमध्ये नेमकी काय चर्चा
Sharad Pawar on chhagan Bhujbal Yeola Assembly Election
Chhagan Bhujbal: छगन भुजबळ यांच्यासमोर येवला मतदारसंघ राखण्याचे आव्हान; शरद पवार भुजबळांच्या विरोधात आक्रमक का?
65 percent voter turnout recorded in first phase of jharkhand assembly polls
पहिल्या टप्प्यात ६५ टक्के मतदान; झारखंडमध्ये माओवाद्यांच्या बहिष्काराच्या आवाहनाकडे मतदारांचे दुर्लक्ष
Shekhar Shende filed complaint against Dr Pankaj Bhoyer for giving sarees and utensils to women
सरकारी सेवेतील लाडक्या बहिणींना साडी-भांडी; तक्रार होताच आमदार म्हणतात…
maharashtra assembly election 2024, aheri constituency,
भाजप पाठोपाठ काँग्रेसचाही बंडखोरांना छुपा पाठिंबा, अहेरी विधानसभेत युती, आघाडीत अंतर्गत कलह

विधान परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारात सरकारी कर्मचारी तसेच शिक्षकांकरिता जुनी निवृत्तिवेतन योजना हा कळीचा मुद्दा ठरला. काँग्रेसशासित राजस्थान, छत्तीसगड आणि हिमाचल प्रदेश, आम आदमी पक्षशासित पंजाब तसेच झारखंड मुक्ती मोर्चा सत्तेत असलेल्या झारखंड या पाच राज्यांमध्ये जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करण्यात आली. जुन्या योजनेत कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर निश्चित अशी रक्कम हाती पडते. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा जुन्या निवृत्तिवेतन योजनेकडे अधिक कल आहे. नुकत्याच झालेल्या हिमाचल प्रदेशमधील निवडणुकीत जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करण्याचे आश्वासन देणाऱ्या काँग्रेसला सरकारी कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबीयांचा भरभरून पाठिंबा मिळाला होता.

विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि शेकापने आधीपासूनच जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करण्यावर प्रचारात भर दिला होता. हा मुद्दा महाविकास आघाडीच्या उमेदरवारांना फायदेशीर ठरू लागला. त्यातच विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करण्याची शक्यता फेटाळली होती. त्या भाषणाची चित्रफीतच महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी समाजमाध्यमातून प्रचारात आणली. भाजपच्या उमेदवारांना जुनी निवृत्तिवेतन योजना तापदायक ठरू लागली.

जुनी निवृत्तिवेतन योजना हा प्रचारातील मुद्दा विरोधात जात असल्याचे लक्षात आल्यानेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुनी योजना लागू करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली. फडणवीस यांनाही आपल्या भूमिकेत बदल करावा लागला.

यामुळेच आधी भाजपला सोपी वाटणारी ही निवडणूक जुनी निवृत्तिवेतन योजना प्रचाराच्या केंद्रस्थानी आल्याने अवघड वळणावर गेली.

प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात भाजप आणि मुख्यमंत्री शिंदे यांनी जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करण्याबाबत अभ्यास करण्याचे आश्वासन दिल्याने त्याचा मतदानावर कितपत परिणाम होतो, यावर भाजपचे यश अवलंबून असेल. काँग्रेसची उमेदवारी नाकारून अपक्ष म्हणून िरगणात उतरलेले आणि भाजपचा अप्रत्यक्ष पाठिंबा असलेल्या सत्यजित तांबे यांनाही प्रचारात जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करण्याचे आश्वासन द्यावे लागले.

भाजपची प्रतिष्ठा पणाला

विधान परिषदेत संख्याबळासाठी भाजपला या पाच जागा महत्त्वाच्या आहेत. परिषदेच्या सध्या २१ जागा रिक्त आहेत. ५७ सदस्यांमध्ये भाजपचे सर्वाधिक २२ आमदार आहेत. सभापतीपद मिळविण्याकरिता भाजपने जास्तीत जास्त जागा जिंकण्यावर भर दिला आहे. नाशिक पदवीधरमध्ये उमेदवारच नसल्याने काँग्रेसला ही हक्काची जागा गमवावी लागली आहे. सध्या विदर्भातील नागपूर शिक्षक आणि अमरावती पदवीधर या दोन्ही जागा भाजपकडे आहेत. या जागा कायम राखण्याबरोबरच अन्य जागा जिंकण्याचे भाजपचे उद्दिष्ट आहे.

सद्य:स्थिती काय?

नाशिक पदवीधर – डॉ. सुधीर तांबे (काँग्रेस)

अमरावती पदवीधर – डॉ. रणजित पाटील (भाजप)

कोकण शिक्षक – बाळाराम पाटील (शेकाप)

नागपूर शिक्षक – नागो गणोर (भाजप)

औरंगाबाद शिक्षक – विक्रम काळे (राष्ट्रवादी)

मतमोजणी गुरुवारी

या निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी होणार आहे. मतदान पसंतीक्रमानुसार असल्याने मतमोजणी पूर्ण होण्यास वेळ लागू शकतो. प्रत्यक्ष मतदानाच्या आकडेवारीनुसार पहिल्या पसंतीची किती मते आवश्यक आहेत हे निश्चित केले जाते. पहिल्या पसंतीची तेवढी मते मिळाल्यास उमेदवाराला विजयी घोषित केले जाते. तेवढी मते कोणत्याच उमेदवाराला मिळाली नाहीत तर सर्वात कमी मते मिळालेल्या उमेदवाराची दुसऱ्या पसंतीची मते मोजली जातात. या उलटय़ा क्रमाने उमेदवारांची दुसऱ्या पसंतीची मते मोजली जातात. सर्व मते मोजून झाल्यावर आवश्यक मते मिळाली नाहीत तर सर्वाधिक मते मिळालेल्या उमेदवाराला विजयी घोषित केले जाते.

आयात उमेदवार

’कोकण शिक्षकमधील भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे हे मूळचे शिवसेनेच्या शिंदे गटाचे. भाजपने शेकापचे बाळाराम पाटील यांना शह देण्यासाठी म्हात्रे यांना िरगणात उतरविले आहे.

’औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातील भाजपचे उमेदवार किरण पाटील हे मूळचे काँग्रेसचे आहेत.

’अमरावती पदवीधरमधील काँग्रेसचे उमेदवार शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होते.

’नाशिक पदवीधरमध्ये भाजपने उमेदवारी मागे घेत पडद्याआडून पाठिंबा दिलेले सत्यजित तांबे हे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते.