मुंबई : गेल्या दोन वर्षांपासून प्रशासक असलेल्या महाराष्ट्र वैद्याकीय परिषदेची नुकतीच निवडणूक जाहीर करण्यात आली. मात्र जाहीर केलेल्या निवडणूक वेळापत्रकानुसार उमेदवारी अर्ज घेण्यासाठी परिषदेच्या कार्यालयात जाणाऱ्या डॉक्टरांना रिकामी हाताने माघारी जावे लागत आहे. त्यामुळे निवडणुकीच्या मैदानात उतरणाऱ्या डॉक्टरांकडून निवडणुकीच्या कारभारातील गोंधळाबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे.

महाराष्ट्र वैद्याकीय परिषदेचा कारभार गेल्या दोन वर्षांपासून प्रशासकांमार्फत चालविण्यात येत होता. नियमानुसार परिषदेच्या निवडणुका घेणे भाग असल्याने परिषदेकडून १७ जानेवारी रोजी निवडणुका जाहीर करण्यात आल्या. त्यानुसार १८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली आहे. निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक उमेदवार अर्ज घेण्यासाठी परिषदेच्या चिंचपोकळी येथील कार्यालयात गेल्यावर त्यांना अर्ज उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे. परिषदेसाठी निबंधक नसल्याने कोणतेही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने त्यांच्यामध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे.

state has 127 gbs patients with two deaths reported
‘जीबीएस’ची रुग्णसंख्या १३० अन् आतापर्यंत २ मृत्यू; आरोग्य सचिवांकडून यंत्रणांची झाडाझडती
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
pune gbs loksatta news
पुण्यात गेल्या वर्षभरात आढळले ‘जीबीएस’चे १८५ रुग्ण; आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून माहिती समोर
Prakash Abitkar marathi news
आरोग्य संस्थांना महिन्यातून किमान दोन वेळा अचानक भेटी द्या, आरोग्य मंत्र्यांच्या आरोग्य विभागातील वरिष्ठांना सूचना
Fill vacant posts of doctors in health department immediately says Health Minister Prakash Abitkar
आरोग्य विभागातील डॉक्टरांची रिक्त पदे तातडीने भरा- आरोग्यमंत्री
Interview schedule for PSI post finally announced by MPSC
‘एमपीएससी’ : पीएसआय पदाच्या मुलाखतीचा कार्यक्रम अखेर जाहीर; या तारखेला निकाल
upsc training center loksatta news
जिल्हास्तरावर यूपीएससी, एमपीएससीचे प्रशिक्षण केंद्र सुरू होणार? सुधारणा समितीसमोर…
complaint filed at Nagpur AIIMS against surgery head for harassing assistant professor
विभाग प्रमुखाकडून सहाय्यक प्राध्यापकाचा छळ… नागपूर एम्समध्ये…

निवडणूक जाहीर होऊन १४ दिवस उलटले तरी अर्ज देण्यात आले नाही. काही उमेदवारांनी याबाबत थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडे विचारणा केल्यानंतर त्यांना मतदारांची यादी पूर्ण झाल्यानंतरच अर्ज मिळतील असे सांगण्यात येत आहे. यामुळे उमेदवारांमध्ये संतापाचे वातावरण पसरले असून निवडणूक प्रक्रियेमध्ये गोंधळ असल्याची टीका हिलिंग हँड युनिटी पॅनेलचे समन्वयक डॉ. तुषार जगताप यांनी केली आहे.

७० हजार डॉक्टरांना प्रक्रियेतून वगळले

वैद्याकीय परिषदेकडे जवळपास दोन लाखांपेक्षा जास्त डॉक्टर नोंदणीकृत आहेत. मात्र यापैकी जवळपास ७० हजार डॉक्टरांनी त्यांच्या नोंदणीचे नूतनीकरण न केल्याने त्यांना मतदार प्रक्रियेतून वगळण्यात आले आहे.

महाराष्ट्र वैद्याकीय परिषदेच्या निबंधकाची नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारपासून ते कर्तव्यावर रूजू होतील. नवीन मतदार यादीनुसार उमेदवारांना अर्ज दिले जाणार आहेत. जेणेकरून त्यांचा अर्ज बाद होणार नाही. अंतिम मतदार यादी जाहीर केल्यानंतर ६ फेब्रुवारीपासून उमेदवारांना अर्ज मिळण्यास सुरुवात होईल. तसेच निवडणुकीदरम्यान उमेदवारांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी काही व्यक्तींची नियुक्ती करण्यात येणार आहे. शिल्पा परबनिवडणूक अधिकारी

Story img Loader