मुंबई : राज्याची अर्थव्यवस्थेचे आकारमान गेल्या वर्षभरात पाच लाख कोटीने वाढून ४५ लाख ३१ हजार कोटी झाले आहे. यंदा अपेक्षेपेक्षा अधिक वेगाने अर्थव्यवस्था वाढल्याने सरकारला काहीसा दिलासा मिळाला आहे. पुढील आर्थिक वर्षाअखेर अर्थव्यवस्थेेचे आकारमान हे ४९ लाख कोटी होईल, असा अंदाज आहे. अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग लक्षात एक लाख कोटी डॉलर अर्थव्यवस्थेच्या आकारमानाचा पल्ला अजून दूर असल्याचेच आकडेवारी दर्शविते.

राज्याचे स्थूल राज्य उत्पन्न किंवा अर्थव्यवस्थेचे आकारमान २०२३-२४ या वर्षात ४० लाख ५५ हजार कोटी होते. २०२४-२५ या सरत्या आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेचे आकारमान सुधारित अर्थसंकल्पानुसार ४५ लाख ३१ हजार होईल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. अर्थसंकल्प सादर करताना स्थूल राज्य उत्पन्न हे ४२ लाख होईल, असा प्राथमिक अंदाज होता. पण यंदा राज्याची अर्थव्यवस्था वेगाने वाढली आहे. स्थूल राज्य उत्पन्नात झालेल्या वाढीमुळे निधीचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्यास मदत झाली.

पुढील आर्थिक वर्षाअखेर अर्थव्यवस्थेचे आकारमान ४९ लाख३९ हजार कोटी असेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. गेल्या वर्षभरात स्थूल राज्य उत्पन्नात ११.७३ टक्के वाढ झाली आहे. पुढील वर्षी हा दर १० टक्के असेल, असा अंदाज आहे.

Story img Loader