Maharashtra Political Crisis: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत राज्यातील स्थितीवर चर्चा केली आहे. काँग्रेस महाविकास आघाडीच्या पाठीशी असल्याचं शरद पवारांना सांगितलं असल्याची माहिती कमलनाथ यांनी दिली आहे. शरद पवार भेटीनंतर कमलनाथ यांनी सिल्व्हर ओकच्या बाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेनेचे बंडखोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याला कलंकित करणार नाहीत असा विश्वास व्यक्त केला.
“काँग्रेसमध्ये एकता आहे. महाराष्ट्रातील आमदार आपल्या देशाची संस्कृती आणि काँग्रेसच्या तत्वांसोबत आहेत हा संदेश संपूर्ण देशाला देतील. आम्ही महाविकास आघाडीला पाठिंबा दिला असून समर्थन देत राहू,” असं कमलनाथ म्हणाले आहेत.
Eknath Shinde Live Updates : कॅबिनेटची बैठक संपली; संभ्रम कायम
यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंसोबतही चर्चा होणार होती, पण करोना झाल्याने भेट होऊ शकली नाही अशी माहिती कमलनाथ यांनी दिली. शरद पवारांनी राष्ट्रवादी महाविकास आघाडीला पाठिंबा देत राहील असं आश्वासन दिलं असल्याचं सांगितलं. शिवसेनेतील बंडखोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याला कलंकित करणार नाहीत असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.
“जास्तीत जास्त सत्ता जाईल,” संजय राऊत स्पष्टच बोलले, एकनाथ शिंदेंसोबत फोनवरुन केली चर्चा
“भाजपा प्रलोभन दाखवत सरकारं पाडत आहे. अरुणाचल प्रदेशपासून त्यांनी हे सुरु केलं होतं. भाजपाचं राजकारण देशाचं भवितव्य धोक्यात टाकत आहे,” अशी टीका कमलनाथ यांनी केली आहे. उद्धव ठाकरेंना आमदार पाठिंबा देतील असा विश्वास असल्याचंही ते म्हणाले. सांगण्यासाठी ते ५० सोबत आहेत असंही सांगू शकतात. उद्यानंतर परवा पण येईलच ना असा टोलाही त्यांनी लगावला.