सौरभ कुलश्रेष्ठ, लोकसत्ता

मुंबई :  गेल्या दोन-अडीच वर्षांत संपर्क-संवादाचा अभाव दूर करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मार्चपासून राज्यात सुरू केलेल्या शिवसंपर्क अभियानात विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील बैठकांमध्ये स्थानिक शिवसेना आमदार. पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीविरोधात आणि त्यातही राष्ट्रवादीच्या कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त झाल्याने शिवसेनेतील बंडाचे संकेत मिळाले होते. याच नाराजीचा स्फोट राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीनंतर आता नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीतून झाला आहे.

water channel in street near Balaji Temple in Ajde Pada area of ​​MIDC in Dombivli burst for few months
डोंबिवलीत आजदे पाड्यातील गळक्या जलवाहिनीमुळे रस्त्यावर चिखल नागरिक त्रस्त, शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
loksatta editorial on rupee getting weaker day by day against the dollar
अग्रलेख : बबड्या रुपया, कारटा डॉलर
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
ishwar allah tero naam bhajan news
Protest on Bhajan: ‘ईश्वर अल्लाह तेरो नाम’ भजनावर आक्षेप घेत घोषणाबाजी; अटल बिहारी वाजपेयींच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमात गोंधळ!
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या

भाजप आपल्याबरोबर युती करून सत्ता मिळवत असताना आपल्याच पक्षाला खिंडार पाडण्याचे डाव टाकत असल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संतापले होते. युती सरकार असतानाही एकनाथ शिंदे काही आमदारांसह फुटणार अशा बातम्या यायच्या. शिवसेना फोडण्याचे काम आज ना उद्या भाजप करणार या रागातूनच २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत संधी मिळताच ठाकरे यांनी महाविकास आघाडीचा प्रयोग करून आपल्या नाराजीला वाट करून दिली. या राजकारणात उद्धव ठाकरे यांच्या रूपात शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळाले. पण त्या वेळीही अनेक शिवसेना आमदारांना ही आघाडी रुचली नव्हती. ज्या राष्ट्रवादी व काँग्रेसच्या विरोधात निवडून येतो त्यांच्याबरोबर सरकार कसे असा प्रश्न त्यांना पडला होता. पण पक्षनेतृत्वासमोर ही मंडळी त्या वेळी शांत राहिली.

शिवसेनेचा मुख्यमंत्री असला तरी आपली कामे होत नाहीत, शिवसेनेच्या आमदारांना विकास निधीत डावलले जाते अशा उघड तक्रारी पहिल्या वर्षीनंतर सुरू झाल्या. फेब्रुवारीतील विधिमंडळ अधिवेशनात शिवसेना व सहयोगी आमदारांच्या नाराजीचा कडेलोट झाला होता. ही मोठय़ा प्रमाणातील नाराजीची पहिली जाहीर ठिणगी होती. पण त्याकडे म्हणावे तसे लक्ष दिले गेले नाही. विधिमंडळ अधिवेशन संपताच शिवसेनेने राज्यात शिवसंपर्क अभियान सुरू केले. त्याअंतर्गत शिवसेनेचे खासदार व नेते विविध लोकसभा मतदारसंघात गेले. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र व विदर्भात या शिवसंपर्क अभियानाच्या बैठकांवेळी शिवसेना आमदारांच्या नाराजीचा भडका उडाला. नेत्यांसमोर नाराजीचा पाढा वाचून शिवसेनेचे आमदार व पदाधिकारी थांबले नाहीत तर महाविकास आघाडी पक्षाच्या मुळावर येत असल्याचा इशाराही काही जणांनी दिला होता.

आमदारांची नाराजी : राष्ट्रवादी कँग्रेस कशा रीतीने शिवसेनेला त्रास देते याचे दाखलेही देण्यात आले. त्यावर पक्षनेतृत्वाच्या कानावर ही नाराजी घालण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पण शिवसेनेत आतल्या आत मोठय़ा प्रमाणात खदखद असून त्याचा कधीही स्फोट होईल असे संकेत त्या अभियानात मिळाले होते. राज्यसभा निवडणुकीत सहयोगी व अपक्ष आमदारांनी व विधान परिषद निवडणुकीत पक्षाच्या आमदारांनी आपली मते भाजपला देत पहिला झटका दिला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे बंड झाले आहे. महाविकास आघाडीऐवजी भाजपबरोबर युती करावी, अशी शिवसेनेतील बहुसंख्य आमदारांची भूमिका आहे. ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक यांनी पक्षप्रमुखांकडे तशी उघडपणे मागणी केली होती. काँग्रेस किंवा राष्ट्रवादीपेक्षा भाजप अधिक फायदेशीर असल्याची भावना शिवसेनेत मोठय़ा प्रमाणावर आहे.

भुजबळ ते शिंदे.. शिवसेनेतील बंडाची परंपरा 

* छगन भुजबळ ते एकनाथ शिंदे अशी शिवसेनेतील बंडखोर नेत्यांची परंपरा आहे. शिवसेना म्हणजे कडव्या शिस्तीतील पक्ष अशी प्रतिमा होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शब्द प्रमाण मानला जायचा. शिवसेनाप्रमुखांच्या विरोधात जाण्याची कोणाची बिशाद नसायची. सुरुवातीच्या काळात माजी महापौर डॉ. हेमचंद्र गुप्ते यांच्यासह काही नेते नेतृत्वाशी न पटल्याने दूर झाले.

* शिवसेनेच्या कडव्या शिस्तीला पहिले आव्हान दिले ते १९९१ मध्ये छगन भुजबळ यांनी. विधिमंडळाच्या नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात भुजबळ यांनी १८ आमदारांसह बाहेर पडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भुजबळ यांच्या बंडानंतर शिवसेनेत प्रतिक्रिया उमटली होती. शिवसैनिकांच्या रोषामुळे भुजबळ यांना लपून बसावे लागले होते.

* भुजबळ यांच्या बंडानंतर नवी मुंबईतील बडे नेते गणेश नाईक यांनी बंडाचे निशाण फडकविले. युतीची सत्ता असताना गणेश नाईक हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत लाडके होते. पण पुढे मातोश्री आणि नाईकांमध्ये बिनसले. नाईक यांच्यावर कुरघोडी करण्याकरिताच नवी मुंबईतील दगडखाणी बंद करून ‘मातोश्री’ने नाईकांचे आर्थिक स्रोतच बंद केले. नाराज झालेल्या नाईकांनी आधी स्वतंत्र संघटना व नंतर राष्ट्रवादीत प्रवेश केला.

* शिवसेनेचे ठाण्यात प्रस्थ असलेल्या आनंद दिघे यांचे पंख कापण्याचे पद्धतशीरपणे प्रयत्न झाले. ठाण्यातील टपऱ्या तोडण्याची कारवाई करून दिघे यांना झटका देण्यात आला होता. नेतृत्वाकडून पंख छाटण्यात आले तरी दिघे यांनी बंडाचे निशाण रोवले नाही.

* मुलुंडमधील शिशिर शिंदे, ठाण्यातील सतीश प्रधान यांनीही नेतृत्वाशी न पटल्याने वेगळा मार्ग पत्करला होता.

उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेची सूत्रे आल्यावर नारायण राणे आणि राज ठाकरे या दोन नेत्यांची लागोपाठ बंड झाली.

* राणे यांनी शिवसेनेला उघड उघडपणे आव्हान दिले होते. मुंबई, कोकणात राणे समर्थक आणि शिवसैनिकांमध्ये अनेक ठिकाणी हाणामाऱ्या झाल्या.  राज ठाकरे यांच्या बंडानंतर मोठय़ा प्रमाणावर कार्यकर्ते पक्षातून बाहेर पडले.

शिवसेना भवनासमोर घोषणाबाजी

एकनाथ शिंदे व अन्य आमदारांनी बंड पुकारल्याच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी शिवसेना भवनाच्या समोर जोरदार घोषणाबाजी केली. शिंदे यांच्या कृतीचा शिवसैनिकांनी निषेध केला. शिवसेना विधिमंडळ पक्षाचे नेते, नगरविकास, सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) अशी महत्त्वाची खाती मिळाली. गेली साडेसात वर्षे मंत्रिपदी आहेत. ठाणे जिल्ह्यात पक्षांतर्गत कारभारात मुक्तवाव आहे. एवढे सारे मिळूनही शिंदे नाराज कसे, असा सवाल शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत होता. शिंदे यांनी दगाबाजी केल्याचा आरोपही शिवसैनिकांनी केला. महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शिंदे व त्यांच्याबरोबर असलेल्या आमदारांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

Story img Loader