मुंबई : ‘‘कार्यकर्त्यांनी रक्ताचे पाणी करून निवडून दिलेल्या काही जणांनी राज्यात मंत्रिपदाची शपथ घेतली. आता ते पक्ष आणि चिन्हावर दावा करीत आहेत. मात्र, भाजपबरोबर गेलेले सत्तेतूनही जातात. जो भाजपबरोबर गेला तो संपला’’, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी बंडखोरांना दिला.

अजित पवार यांच्या बंडाला प्रत्युत्तर देण्यासाठी शरद पवार यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण केंद्रात खासदार, आमदार आणि जिल्हाध्यक्षांची बैठक बुधवारी आयोजित करण्यात आली होती. राज्यभरातून आलेले कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी यशवंतराव चव्हाण केंद्र खच्चून भरले होते. या वेळी शरद पवार यांनी बंडखोर नेत्यांबरोबरच मोदी सरकावर जोरदार टीकास्त्र सोडले.

Image of Manmohan Singh's sister
Manmohan Singh Death : मनमोहन सिंग यांच्या बहिणीची व्यथा, आजारपणामुळे घेता येणार नाही भावाच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Manmohan Singh is the second Prime Minister to visit Deekshabhoomi after Atal Bihari Vajpayee
अटलबिहारी वाजपेयींनंतर दीक्षाभूमीला भेट देणारे डॉ. मनमोहन सिंग दुसरे पंतप्रधान होते
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
kalyan municipalitys Rukminibai Hospital show that three people were bitten by stray dog
कल्याणमधील भटक्या श्वानाचे तीन जणांना चावे, भटक्या श्वानांच्या उपद्रवाने नागरिक, शाळकरी विद्यार्थी त्रस्त
Two hundred acres of farmland damaged by rangava in Shirala
शिराळ्यात गव्यांकडून दोनशे एकर शेतीचे नुकसान
Dr. Manmohan Singh passes away at 92
Manmohan Sing Death : मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, “माझे आदर्श आणि मार्गदर्शक..”
Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”

‘‘पक्ष किंवा चिन्ह हातातून जाऊ देणार नाही. त्यामुळे जे गेले, त्यांची चिंता करू नका. मी पुन्हा जनतेमध्ये जाऊन नवे नेतृत्व निर्माण करेन’’, अशा शब्दांत पवारांनी उपस्थित कार्यकर्त्यांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला.

पुलोद’चा प्रयोग आणि नागालॅन्डमध्ये भाजपशी केलेल्या हातमिळवणीबद्दल अजित पवार यांनी टीका केली होती. त्यासही पवार यांनी प्रत्युत्तर दिले. ‘‘मी १९७८ मध्ये ‘पुलोद’चा प्रयोग केला. त्यामध्ये जनता पक्ष होता, भाजप नव्हे. तसेच नागालँड हे ईशान्येकडील सीमेवरील

राज्य असून, तिथे स्थिर, खंबीर सरकार असावे, या हेतूने सरकारला पाठिंबा दिला’’, असे पवार म्हणाले.

‘पांडुरंग म्हणायचे, गुरु म्हणायचे आणि आरोप करायचे असे प्रकार सुरू आहेत, असे सांगताना पवार यांनी बंडखोरांना पक्षाने खूप काही दिले, याकडे लक्ष वेधले. ‘‘एकाला तुरुंगातून बाहेर आल्यानंतर निवडणुकीचे तिकीट दिले. महाविकास आघाडी सरकारमध्येही मंत्री केले. मी यांना काय कमी दिले?’’, असा सवाल पवार यांनी केला.

‘‘तुम्ही शिवसेनेबरोबर गेला, मग आम्ही भाजपबरोबर गेलो तर त्यात चूक काय, असे काही जण म्हणतात. पण, यात फरक आहे. शिवसेनेचे हिंदूत्व अठरापगड जातींच्या लोकांना बरोबर घेऊन जाणारे आहे, तर भाजपचे हिंदुत्व विभाजनवादी, विषारी, मनुवादी आणि विघातक आहे’’ असे नमूद करत पवार यांनी शिवसेनेबरोबरील आघाडीचे समर्थन करताना बंडखोरांना फटकारले.

हे आमदार उपस्थित

विधानसभेचे किरण लहामाटे, अशोक पवार, राजेंद्र शिंगणे, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, प्राजक्त तनपूरे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, रोहित पवार, संदीप क्षीरसागर, बाळासाहेब पाटील, चेतन तुपे, सुमन पाटील, मानसिंग नाईक, आशुतोष काळे, देवेंद्र भुयार (अपक्ष) आदी आमदार पवार यांच्या बैठकीला उपस्थित होते. श्रीनिवास पाटील, अमोल कोल्हे, फौजिया खान, वंदना चव्हाण हे खासदार तसेच विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे, बाबाजानी दुर्रानी आदी उपस्थित होते.

‘भुजबळ पाहून येतो म्हणाले अन् तिकडे सामील झाले’

छगन भुजबळांनी तिकडे काय सुरू आहे, ते पाहून येतो म्हणून फोन केला आणि मंत्रीपदाची शपथ घेऊन तिकडे सामील झाले. त्यामुळे यापुढे कोणी ‘तिकडे काय चालले आहे हे पाहून येतो’ असे बोलले तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका, असा टोलाही पवार यांनी भुजबळांना लगावला.

 पवार म्हणाले..

’‘पांडुरंग म्हणायचे, गुरू म्हणायचे आणि आरोप करायचे, असे सध्या चालले आहे.

’त्यांचे नाणे चालणार नाही, म्हणून ते माझे छायाचित्र वापरत आहेत.

’शिवसेनेचे हिंदूत्व अठरापगड जातींच्या लोकांना बरोबर घेऊन जाणारे, तर भाजपचे हिंदुत्व विभाजनवादी, मनुवादी आहे.

आमच्यावर जी टीका करायची असेल ती करा, पण आमच्या आई-वडिलांबद्दल बोलू नका. उद्योगपती रतन टाटा या वयातही काम करतात. ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन हे वयाच्या ८० व्या वर्षी जाहिरातीत आणि मोठय़ा पडद्यावर दिसतात. वडीलधाऱ्यांना थांबायला सांगणाऱ्या मुलांपेक्षा आम्ही मुली बऱ्या.

– सुप्रिया सुळे, कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

Story img Loader