मुंबई : दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) परिसरात धुळीमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई आयआयटीने दिलेल्या उपाययोजना अंमलात आणण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) पुढील आठवड्यात मैदानातील धूळीबाबत आढावा घेणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दादर पश्चिमेला असलेले छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील माती वाऱ्यामुळे उडून आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषण होत आहे. काही दिवसांपूर्वी धुळीच्या समस्येबाबत एमपीसीबीचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मैदानाला भेट देऊन तेथील समस्या जाणून घेतली. तसेच याबाबत तातडीने निर्णय घ्यावा व कार्यवाहीला सुरुवात करावी, असे निर्देश त्यांनी माहापालिकेला दिले होते. त्यानुसार मैदानावर धुळीमुळे होणारे प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी मुंबई आयआयटीने दिलेल्या अहवालानुसार अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना अंमलात आणण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. यामध्ये मातीचा स्तर नियंत्रित करणे, धूळ नियंत्रणासाठी मातीवर सातत्याने पाणी फवारणे यांसारख्या उपाययोजनांचा समावेश असणार आहे. तसेच वाऱ्याच्या वेगाचा अभ्यास करून त्यावर तोडगा काढणे या उपयायोजनांचा समावेश आहे. दरम्यान, अंमलात आणलेल्या उपाययोजनांमुळे झालेला परिणाम, मैदानातील धुळीबाबत एमपीसीबी पुढील आठवड्यात आढावा घेणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले.

uहेही वाचा : Himalayan Vulture : उरणमध्ये हिमालयीन गिधाडाला जीवदान

छत्रपती शिवाजी महाराज मैदान विविध खेळांसाठी प्रसिद्ध आहे. तब्बल ९८ हजार चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या या मैदानात विविध खेळ खेळण्यासाठी मुले येतात. या मैदानात विविध क्लबच्या आठ खेळपट्ट्या आहेत. हे क्लब आपापल्या परिसराची देखभाल व स्वच्छता करतात. मात्र त्याव्यतिरिक्त मैदानाचा परिसर दुर्लक्षितच असतो. मैदानातील धुळीची समस्या दूर करण्यासाठी आतापर्यंत रहिवाशांनी अनेक वेळा पालिकेकडे पाठपुरावा केला होता. मात्र या समस्येवर तोडगा निघू शकलेला नाही. पालिकेच्या विभाग कार्यालयाने दोन वर्षांपूर्वी हिरव्या गवताची पेरणी केली होती. तसेच पर्जन्य जलसंचय यंत्रणा, तुषार सिंचन असेही अनेक प्रयोग करण्यात आले होते.

uहेही वाचा : रखडलेली पशुगना ४२ टक्क्यांवर; जाणून घ्या आढावा बैठकीत सचिवांनी काय आदेश दिले

विविध उपाययोजना

मैदानावर धुळीमुळे होणारे प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी मुंबई आयआयटीने दिलेल्या अहवालानुसार अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना अंमलात आणण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. यामध्ये मातीचा स्तर नियंत्रित करणे, धूळ नियंत्रणासाठी मातीवर सातत्याने पाणी फवारणे यांसारख्या उपाययोजनांचा समावेश असणार आहे. तसेच वाऱ्याच्या वेगाचा अभ्यास करून त्यावर तोडगा काढणे या उपयायोजनांचा समावेश आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra pollution control board review shivaji park dust issue mumbai print news css