मुंबई : राज्यभरात उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. गुरुवारी चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक ३७.२ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. राज्यातील कमाल तापमान सरासरी ३३ ते ३५ अंश सेल्सिअसपर्यंत गेले आहे.

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासूनच राज्यात उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत. विदर्भात सरासरी ३२ ते ३५, मराठवाड्यात सरासरी ३३ ते ३५, मुंबईसह किनारपट्टीवर २८ ते ३० आणि मध्य महाराष्ट्रात ३३ ते ३५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे.

nisargalipi A sign of arrival of spring season
निसर्गलिपी : वसंतागमनाची चाहूल
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
How Did the Month of
February : फेब्रुवारी महिन्याला हे नाव कसं मिळालं? यामागची रंजक गोष्ट काय आहे माहीत आहे का?
weather forecast maharashtra Summer heat cold February maharashtra weather department
फेब्रुवारीपासूनच उन्हाच्या झळा, राज्यातील थंडी संपली? हवामान विभागाचा अंदाज काय?
Which festival will be celebrated in February
February Festival 2025: फेब्रुवारी महिन्यात कोणते सण कोणत्या दिवशी साजरे केले जाणार? जाणून घ्या गणेश जयंती, महाशिवरात्री अन् एकादशीची तारीख; पाहा संपूर्ण यादी…
pune highest temperature marathi news
Pune Temperature : जानेवारीतील सर्वाधिक तापमानाचा नवा विक्रम; उष्णता का वाढली?
All-party meetings in Parliament
अर्थअधिवेशन आजपासून, पहिला टप्पा १३ फेब्रुवारीपर्यंत; अर्थसंकल्पाबाबत उत्सुकता
Maharashtra hailstorm loksatta news
उत्तर महाराष्ट्रात गारपीट, हलक्या पावसाची शक्यता, जाणून घ्या हवामान विषयक स्थिती आणि इशारा

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वातावरणाच्या वरच्या स्तरात वाऱ्याची प्रतिचक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांना अटकाव निर्माण झाला आहे. त्यामुळे थंड वारे राज्यापर्यंत पोहचत नाहीत. दुसरीकडे दक्षिणेकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा वेग वाढला आहे. त्यामुळे राज्यातील तापमानात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

तापमान आणखी वाढणार सध्या कमाल तापमानात झालेली वाढ आणखी दोन – तीन दिवस कायम राहणार आहे. त्यानंतर चार – पाच दिवस कमाल तापमानात एक ते दोन अंशाने वाढ होईल. उत्तरेकडून येणारे थंड वारे आपल्यापर्यंत पोहचत नाहीत. त्यामुळे तापमान वाढीचा सामना करावा लागत आहे. कमाल तापमानात झालेली वाढ पुढील आठवडाभर कायम राहण्याचा अंदाज आहे, अशी माहिती हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी व्यक्त केला आहे.

Story img Loader