मुंबई : करोना रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून सुरू असलेली घट मंगळवारीही कायम राहिली. राज्यात मंगळवारी १३९ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली तर ७२० रुग्ण बरे झाले. त्यामुळे करोना रुग्णांच्या तुलनेत बऱ्या होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे.
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१३ टक्के झाले आहे. राज्यात मंगळवारी करोनाने एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. १ जानेवारीपासून आजपर्यंत ९७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्युदर १.८१ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८ कोटी ७० लाख २ हजार ४२१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८१ लाख ६६ हजार २०७ (९.३९ टक्के) रुग्ण आढळले आहेत. राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या ३ हजार ३५१ इतकी आहे. त्याचप्रमाणे राज्यात आतापर्यंत एक्सबीबी.१.१६ या करोना उपप्रकारचे १११२ रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन टक्के प्रवाशांच्या चाचणीतून बाधित आढळलेल्या १०७ प्रवाशांचे नमुने जनुकीय क्रमनिर्धारण तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
राज्यात ‘एच ३ एन २’चे चार नवे रुग्ण
राज्यात मंगळवारी ‘एच३ एन२’च्या चार नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे ‘एच३ एन२’च्या रुग्णांची संख्या ४७१ इतकी झाली आहे. तसेच मंगळवारी विविध रुग्णालयांत ५५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दाखल रुग्णांची माहिती
* गृह विलगीकरणात असलेले रुग्ण – ३९३२ (९५ टक्के)
* रुग्णालयात दाखल असलेले रुग्ण – ३७३५ (५ टक्के)
* अतिदक्षता विभागात नसलेले रुग्ण – १५९ (४ टक्के)
* अतिदक्षता विभागात असलेले रुग्ण – ३८ (१ टक्के)
साप्ताहिक करोना रुग्णसंख्या
* ५ ते ११ एप्रिल – ४८७५
* १२ ते १८ एप्रिल – ६११७
* १९ ते २५ एप्रिल – ५५४९
* २६ एप्रिल ते २ मे – ३३६५