विनायक डिगे, लोकसत्ता

मुंबई : ओमिक्रॉनचा नवा उपपक्रार असलेल्या ‘जेएन.१’चा रुग्ण सिंधुदुर्गात सापडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या नव्या उपप्रकाराचा सामना करण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज असला तरी मागील महिनाभरापासून राज्यामध्ये करोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. राज्यामध्ये मागील चार आठवड्यांमध्ये म्हणजेच २४ नोव्हेंबरपासून आतापर्यंत तब्बल १०२ रुग्ण सापडले आहेत. पहिल्या आठवड्याच्या तुलनेत चौथ्या आठवड्यातील रुग्णसंख्येत चार पटीने वाढ झाली आहे.

Successful treatment of an elderly woman suffering from hernia and comorbidities Pune news
हर्नियासह सहव्याधींनी ग्रस्त ज्येष्ठ महिलेवरील उपचारांचे आव्हान, दोन महिन्यांच्या प्रयत्नांनंतर यशस्वी
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Viral Video Of Girls Hostel
आनंदच निराळा…! अंघोळीसाठी रांगा, केसांत ब्रश अन्… VIRAL VIDEO पाहून डोळ्यांसमोर येईल तुमची ‘हॉस्टेल लाईफ’
four days week in japan
विश्लेषण : जन्मदर वाढविण्यासाठी जपानमध्ये चार दिवसांचा आठवडा..! काय आहेत कारणे? योजना कशी राबवणार?
Onion prices fall due to increased production
नाशिक : आवक वाढल्याने कांद्याची घसरण
number of ST bus accidents increased in Nashik division
नाशिक विभागात एसटी अपघातांचा उंचावता आलेख; नऊ महिन्यांत बसचे १२० अपघात, २२ जणांचा मृत्यू
Saket Bridge, Mumbai Nashik Traffic, Road Widening,
मुंबई-नाशिक मार्गावर पुढील तीन महिने कोंडीचे, साकेत पुलाजवळील मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणास सुरूवात
Cold weather Thane district, Thane district temperature,
ठाणे जिल्हा पुन्हा गारठला, जिल्ह्यातील तापमान सरासरी १२ अंश सेल्सिअस

हेही वाचा >>> पुढील दोन दिवस मुंबईत ढगाळ वातावरण

राज्यामध्ये २४ ते ३० नोव्हेंबरदरम्यान करोनाचे १३ रुग्ण होते. त्यामध्ये सातत्याने वाढ होत असून, १५ ते २१ डिसेंबरदरम्यान राज्यात ५३ रुग्ण सापडले आहेत. चार आठवड्यांमध्ये करोना रुग्णांच्या संख्येत चार पटीने वाढ झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. २४ नोव्हेंबर ते २१ डिसेंबर या चार आठवड्यांमध्ये राज्यामध्ये करोनाचे १०२ रुग्ण सापडले आहेत. यापैकी ५३ रुग्ण सध्या सक्रिय आहेत. यापैकी मुंबईमध्ये सर्वाधिक २७, ठाणे १०, पुणे १०, रायगड ३, कोल्हापूर २ आणि नागपूरमध्ये एक सक्रिय रुग्ण आहे. मुंबईमध्ये २१ डिसेंबरपर्यंत केलेल्या १००५ चाचण्यांमध्ये ३४ रुग्ण करोनाबाधित आढळले आहेत. त्यातील २७ रुग्णांवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असून, उर्वरित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सापडलेल्या करोना रुग्णांपैकी ९१.१ टक्के रुग्ण गृह विलीगीकरणात आहेत. तर ८.९ टक्के रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या रुग्णांपैकी अतिदक्षता विभागात ४.४ टक्के, तर सर्वसाधारण विभागातील रुग्णांची संख्या ४.५ टक्के इतकी आहे.

हेही वाचा >>> मालाडमधील शाळेत चार वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार

वर्षभरात १३४ जणांचा मृत्यू

गेल्या वर्षभरात राज्यातील करोना रुग्णांची संख्या आटोक्यात  होती. मात्र १ जानेवारी २०२२ पासून आजपर्यंत तब्बल १३४ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये सहव्याधी असलेल्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. मृत्युंपैकी ७०.९० टक्के रुग्ण ६० वर्षांवरील, तर ८४ टक्के सहबाधित, १६ टक्के कोणताही आजार नसलेले रुग्ण होते. सध्या राज्यातील मृत्युदर १.८१ टक्के आहे.

चार आठवड्यातील रुग्णसंख्या

२४ ते ३० नोव्हेंबर – १३

१ ते ७ डिसेंबर – १७

८ ते १४ डिसेंबर – १९

१५ ते २१ डिसेंबर – ५३

Story img Loader