राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते वाजत गाजत उद्घाटन झालेल्या दिल्लीतील महाराष्ट्र सदनाचे अवघ्या महिनाभरात दशावतार झाले असताना कंत्राटदारांवर मेहरबान होऊन सरकारने पन्नास हजार चौरस फुटांचे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत बांधकाम करण्यास परवानगी दिली.यातून त्यांना ५४ कोटी रुपयांचा फायदा मिळणार आहे. त्यामुळे शासनाचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हेही या घोटाळ्यास जबाबदार असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शनिवारी केला.
 एकीकडे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या  माध्यमातून या घोटाळ्याच्या चौकशीचे सोंग केले जात आहे तर दुसरीकडे राज्य शासन कंत्राटदारांना ५० हजार चौरस फूटाचे चटईक्षेत्रफळ बहाल करीत असल्याचे सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.