जनमताचा रेटा आणि सर्वपक्षीय आमदारांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेपुढे अखेर मुख्यमंत्री आणि राज्य लोकसेवा आयोगाला (एमपीएससी) माघार घ्यावी लागली. ७ एप्रिलला होणारी आयोगाची पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. पुढील तारीख आयोग नंतर जाहीर करील, अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी विधिमंडळात केली. आता परीक्षेची पुढील तारखेबाबत उमेदवारांमध्ये उत्सुकता आहे.
लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळाला ‘व्हायरस’ चा फटका बसल्याने राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी बसलेल्या सर्व उमेदवारांची माहिती नष्ट झाली होती. परीक्षेला अवघे चार दिवस राहिले असताना उमेदवारांना त्यांची माहिती पुन्हा भरण्याची सूचना आयोगाने केल्यामुळे उमेदवारांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. गुरूवार सायंकाळपर्यंत ही माहिती भरायची होती. परंतु एकाच वेळी राज्यभरातील लाखो उमेदवार आपली माहिती भरण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे संकेतस्थळ सतत क्रॅश होत होते.
या परीक्षेसाठी सव्वा तीन लाख उमेदवार बसले आहेत. माहिती भरण्यासाठी आणखी एक दिवस वाढवून परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार घेण्याचे आयोगाच्या विचाराधीन होते. मात्र, परीक्षार्थी, क्लास चालक, विद्यार्थी संघटना, राजकीय संघटना यांच्याकडून वाढत चाललेल्या दबावाच्या पाश्र्वभूमीवर ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा