असभ्य वर्तन केल्याप्रकरणी अभिनेत्री तनुश्री दत्ता हीने अभिनेते नाना पाटेकर यांच्याविरोधात केलेल्या तक्रारीची राज्य महिला आयोगाने मंगळवारी दखल घेतली. दरम्यान, या प्रकरणी आयोगाने नाना पाटेकर, गणेश आचार्य, समीर सिद्दीकी आणि राकेश सारंग यांना नोटीस बजावली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

राज्य महिला आयोगाने नोटीस बजावून नाना पाटेकर यांच्यासह चौघांनाही १० दिवसांत आपले म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी काय कारवाई केली याचा अहवालही सादर करण्यास सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर सविस्तर माहितीसाठी तनुश्री दत्ता यांनी आयोगासमोर उपस्थित राहण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

त्याचबरोबर या प्रकरणात सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनला (सिन्टा) तत्काळ याप्रकरणी तक्रार निवारण समिती (आयसीसी) स्थापन करण्याचे आदेशही राज्य महिला आयोगाने दिले आहेत. तसेच ही यंत्रणा या प्रकरणी काय कारवाई करीत आहे, कारवाईसाठी ती सक्षम आहे की नाही, अशी विचारणाही आयोगाने पोलिसांकडे केली आहे.

दरम्यान, तनुश्रीने आपल्याला न्याय मिळावा या मागणीसह राज्य महिला आयोगात धाव घेतली होती. याची गंभीर दखल आज आयोगाने घेतली. नाना पाटेकर, गणेश आचार्य, निर्माता समीर सिद्दीकी, दिग्दर्शक राकेश सारंग आणि काही मनसे कार्यकर्त्यांची आपला छळ केल्याप्रकरणी चौकशी करण्यात यावी अशी मागणी तीने आपल्या तक्रारीत केली होती.