‘ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल् मुसलिमीन’ अर्थात ‘एमआयएम’च्या दोन्ही आमदारांनी विश्वासदर्शक ठरावावेळी भाजपच्या विरोधात मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच विधानसभेत विरोधी बाकांवर बसणार असल्याचेही एमआयएमचे आमदार इम्तियाज जलिल यांनी बुधवारी जाहीर केले.
‘एमआयएम’चे आमदार भाजपसोबत सत्तेत सहभागी होणार नाहीत. विरोधी बाकांवर बसून आम्ही प्रभावीपणे विरोधकाची भूमिका निभावू, असेही इम्तियाज म्हणाले.
भायखळा मतदार संघातून निवडून आलेले वारिश युसूफ पठाण आणि औरंगाबाद मध्यमधून इम्तियाझ जलिल हे दोन आमदार विधानसभेत ‘एमआयएम’चे प्रतिनिधित्व करत आहेत.
शिवसेनेने पाठोपाठ आता ‘एमआयएम’नेही भाजपविरोधात मतदान करण्याचे ठरविल्याने बहुमताचा आकडा गाठण्याचा भाजपचा मार्ग धुसर होताना दिसत आहे. अशावेळी आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
आणखी वाचा