मुंबई : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र २०२४ मधील विविध वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यातील लेखी परीक्षा २२ जून २०२४ पासून सुरू होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विद्यापीठाच्या विविध पदवी, पदव्यूत्तर व विद्यापीठ संचलित अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षा राज्यातील एकूण २०७ परीक्षा केंद्रावर होणार आहेत. या परीक्षेत बी.डी.एस, बी.ए.एम.एस., बी.यु.एम.एस., बी.एच.एम.एस., उर्वरित पदवी अभ्यासक्रमाच्या तसेच बी.एस्सी. नर्सिंग, बेसिक बी.एस्सी. नर्सिंग, पी.बी. बी.एस्सी. नर्सिंग, बी.पी.टी.एच. बी.ओ.टी.एच. बी.पी.ओ. बी.ए.एस.एल.पी., एम.डी.एस., डिप्लोमा डेन्टींस्ट्री, एम.डी.-एम.एस. आयुर्वेद अँड युनानी, डिप्लोमा आयुर्वेद, एम.डी. होमिओपॅथी, एम.ओ.टी.एच., एम.एस्सी. नर्सिंग, एम.पी.टी.एच., एम.पी.टी., एम.ए.एस.एल.पी. , एम.एस्सी. (ऑडिओलॉजी), एम.एस्सी., (एस.एल.पी.), एम.पी. ओ.च्या परीक्षा घेण्यात येणार आहेत.

हेही वाचा…मुंबई पालिकेच्या वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एम.पी.एच., एम.पी.एच (एन), एम.बी.ए., एम. फिल., बी. ऑप्टोमेट्री, डिप्लोमा ऑप्टोमेट्री, ऑप्थॉलमिक, डिप्लोमा पॅरामेडिकल, सी.सी.एम.पी., एम.एम.एस.पी.सी., पी.जी. डि.एम.एल.टी., बी.पी.एम.टी., एम.एस्सी. फार्मास्युटिकल अभ्यासक्रमाच्या परीक्षा विद्यापीठाचे http://www.muhs.ac.in अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार घेण्यात येणार आहेत. राज्यातील सुमारे ८२ हजार २६७ विद्यार्थी या परीक्षांना देणार असल्याचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra university of health sciences to begin summer session 2024 exams on 22 june over 82000 students to participate mumbai print news psg