राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले होते. तब्बल दीड महिन्यानंतर राज्यातील निर्बंध करण्याच्या दिशेनं सरकारनं पावलं टाकली असून, तसे आदेशही काढण्यात आले आहेत. राज्यात सोमवारपासून टप्प्याटप्प्याने ‘अनलॉक’ होत आहे. त्यामुळे मुंबईकरांना उत्सुकता आहे ती लोकलमधून सर्वसामान्यांना प्रवास करण्यास मूभा देण्यात आली की नाही याची… राज्य सरकारने कोणत्या जिल्ह्यात कोणत्या सेवा पूर्णक्षमतेनं सुरू होतील याचा उल्लेख केला असून, त्यात लोकल सेवेबद्दलही माहिती देण्यात आलेली आहे.

राज्य सरकारने अनलॉकचे आदेश काढताना पाच गटांत जिल्ह्यांची वर्गवारी केली आहे. पॉझिटिव्ही रेट आणि व्पापलेल्या ऑक्सिजन बेडच्या टक्केवारीनुसार जिल्ह्यांची पाच गटात विभागणी केली जाणार आहे. त्यावरच संचारबंदी हटवण्यासह इतर सेवांना परवानगी दिली जाणार आहे. पहिल्या गटात येणाऱ्या जिल्ह्यांमधील सर्व निर्बंध हटवले जाणार आहेत. त्याचबरोबर सर्व व्यवहार पूर्वीप्रमाणे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पहिल्या गटात येणाऱ्या जिल्ह्यांतच लोकल सेवा पूर्वीप्रमाणे सुरू करण्यास मूभा देण्यात आलेली आहे. मात्र, स्थितीनुसार स्थानिक आपत्ती व्यवस्थापन विभागास निर्बंध घालण्याची मुभा असेल, असंही आदेशात म्हटलं आहे.

हेही वाचा – ‘अनलॉक’चा गोंधळ संपला! मध्यरात्री निघाले आदेश; पाच टप्प्यात हटणार निर्बंध

लोकल सेवा सुरू होऊ शकते का?

ज्या जिल्ह्यांमध्ये करोना पॉझिटिव्हिटी दर हा ५ टक्के आणि ऑक्सिजन बेड २५ टक्केपेक्षा कमी भरलेले आहेत. त्यांचा पहिल्या गटात समावेश केला जाणार आहे. अशाच ठिकाणी लोकल सेवा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, मुंबईतील पॉझिटिव्हीटी रेट हा ५.२५ टक्के असून, ठाणे जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेटही जवळपास ७.५४ टक्क्यांच्या जवळपास आहे. पॉटिव्हिटी रेटनुसार दोन्ही जिल्ह्यांचा समावेश तिसऱ्या गटात होतो. त्यामुळे लोकलमधून प्रवास करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांना प्रतिक्षाच करावी लागणार आहे.

हेही वाचा – लग्नसमारंभ, हॉटेल, मॉल, प्राव्हेट ऑफिसेस… कुठे काय सुरु काय बंद जाणून घ्या सोप्या शब्दांमध्ये

तिसऱ्या गटात येणाऱ्या जिल्ह्यात कोणते निर्बंध हटणार?

अत्यावश्यक दुकानं सकाळी ७ ते २ आणि इतर दुकानं सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते २ सर्व खुली राहतील, मॉल्स थिएटर्स सर्व बंद राहतील, सोमवार ते शुक्रवार हॉटेल्स ५० टक्के क्षमतेनं दुपारी २ पर्यंत खुली राहतील, तर त्यानंतर पार्सल सेवा देता येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे शनिवार रविवार बंद राहतील. लोकल रेल्वे सेवा सर्वसामान्यांसाठी बंद राहणार आहे. मॉर्निंक वॉक, मैदाने, सायकलिंग पहाटे ५ ते सकाळी ९ मुभा, ५० टक्के क्षमतेनं खासगी आणि शासकीय कार्यालय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सोमवार ते शुक्रवार आऊटडोअर क्रीडा सकाळी ५ ते ९ सुरू असणार आहेत. सोमवार ते शनिवार स्टुडियोत चित्रीकरण करता येणार आहे. मनोरंजन कार्यक्रम ५० टक्के क्षमतेसह दुपारी २ पर्यंत खुले असणार आहेत. बांधकामांना दुपारी दोन पर्यंत मुभा असणार आहे. जमावबंदीसंचारबंदी कायम राहणार आहे.

Story img Loader