आजची तरुण पिढी जबाबदार वाटते. गोरेगावमध्ये मेट्रो कारशेडविरोधातील आंदोलनाच्यावेळी हे दिसून आले. झाडे कापण्याला विरोध करण्यासाठी मोठया संख्येने युवा वर्ग आंदोलनात उतरला होता असे प्रसिद्ध दिग्दर्शक, गीतकार गुलजार म्हणाले.

ते मतदानाचा हक्क बजावल्यानंतर माध्यमांशी बोलत होते. मी लोकसभेलाही मतदान केले. आता विधानसभेलाही मतदानाचा हक्क बजावला. विधानसभा निवडणुकीच्यावेळी त्यांनी जनतेला स्थानिक मुद्यांवर मतदान करण्याचे आवाहन केले.

Story img Loader