मुंबई : जिवंत मतदाराला मृत घोषित केल्याची घटना मुंबादेवी मतदारसंघातील एका मतदान केंद्रावर घडली. गोव्याहून खास मतदानासाठी आलेले अँथोनी ब्रिगेन्झा यांच्या नावापुढे मृत असल्याचे दर्शवण्यात आले होते. मात्र अखेर वादावादीनंतर त्यांना मतदान करण्याची परवानगी मिळाली.
मुंबादेवी मतदारसंघातील मुंबई सेंट्रल येथील एका मतदान केंद्रावर ही घटना घडली. मुंबई सेंट्रलच्या बीआयटी चाळीत राहणारे अँथोनी ब्रिगेन्झा हे मतदान केंद्रावर गेले असता तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांना मतदान करण्यास मनाई केली. मतदार यादीनुसार त्यांना मृत घोषित करण्यात आले होते. हे ऐकून ब्रिगेन्झा यांना प्रचंड धक्काच बसला. त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यास कोणीही तयार नव्हते.
याबाबत ब्रिगेन्झा यांनी सांगितले की, मी गोव्याला राहतो. अधूनमधून मुंबईतील घरी येतो. लोकसभा निवडणुकीच्या वेळीही मी मुंबईत येऊन मतदान करून गेलो होतो. मात्र यावेळी मला मृत घोषित केल्यामुळे धक्काच बसला. अखेर येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी मला मदत केली.
हेही वाचा >>> मुंबई : मतदारांना निवडणूक केंद्रांवर नेण्यासाठी कार्यकर्त्यांची कसरत
माझे निवडणूक ओळखपत्र आणि आधार कार्ड दाखवल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांची खात्री पटली. त्यांनी माझ्याकडून नियमाप्रमाणे मी जिवंत असल्याचा डिक्लेरेशन फॉर्म भरून घेतला. त्यानंतर मी मतदान केले, असे त्यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. दरम्यान, डिक्लेरेशन फॉर्म भरून झाल्यानंतर त्याची छायांकित प्रत देण्यात यावी, अशीही मागणी ब्रिगेन्झा यांनी केली होती. निवडणूक कार्यालयाच्या रेकॉर्डवरील मृत्युची नोंद काढून टाकण्यासाठी ही प्रत त्यांनी मागितली. त्यावेळी अधिकाऱ्यांनी त्यालाही मनाई केली. मात्र अखेर त्यांना ही प्रत देण्यात आली.