मुंबई : विधानसभा निवडणुकीत बुधवारी राज्यात सरासरी ६५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले आहे. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतांचा टक्का वाढल्याचे चित्र आहे. अखेरच्या काही तासांत मतदानाने जोर पकडल्याचे चित्र राज्याच्या काही भागांत दिसले. संपूर्ण आकडेवारी हाती आल्यानंतर मतदान ६८ टक्क्यांच्या घरात जाण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. मात्र मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर या शहरी भागांमध्ये काहीसा निरुत्साह कायम असल्याचे दिसले.

नाशिक जिल्ह्यासह राज्यातील काही केंद्रांवर रात्री नऊ वाजेपर्यंत मतदान सुरू होते. त्यामुळे मतदानाची जिल्हानिहाय अंतिम आकडेवारी येण्यास विलंब लागला असला तरी अखेरचे वृत्त हाती आले, तोपर्यंत मतदानाने ६५ची टक्केवारी गाठली होती. यात आणखी भर पडण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात ६१.२९ टक्के मतदान झाले होते. त्या तुलनेत मतदानात वाढ होण्याचा अंदाज आहे. मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर या चार मोठ्या शहरांमध्ये टक्का वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाने विशेष प्रयत्न केले होते. मात्र त्याला फारसे यश आले नसल्याचे (पान ८ वर) (पान १ वरून) दिसले. राज्यात सर्वाधिक ८२ टक्के मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील कागल मतदारसंघात झाले आहे. तेथे वैद्याकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादीचे (शरद पवार) समरजितसिंह घाटगे यांच्यातच चुरशीची लढत होत आहे. सर्वात कमी ४१ टक्के मतदान हे कल्याण पश्चिम मतदारसंघात झाले आहे. मंत्रालय व विधानभवन ही सत्तेची प्रमुख केंद्रे असलेल्या कुलाबा मतदारसंघांत टक्केवारी वाढविण्यासाठी बरेच प्रयत्न झाले असले तरी ४५ टक्केच मतदान झाले आहे.

voter turnout Maharashtra
मतदानाचा टक्का जैसे थे, सरासरी ६० टक्के प्रतिसाद; ग्रामीण भागात उत्साह, शहरवासी उदासीनच
maharashtra vidhan sabha election 2024 exit polls result
मतदानोत्तर चाचण्या गोंधळलेल्या, विविध संस्थांच्या अंदाजांत विसंगती
supriya sule bitcoin scam
‘बिटकॉइन’प्रकरणी छत्तीसगडमध्ये छापे, कथित घोटाळ्याचे राजकीय लागेबांधे असल्याचा ‘ईडी’ला संशय
muslim majority areas voting
मुंबईच्या काही भागांमध्ये निरुत्साह, मुस्लीमबहुल भागात तुलनेने अधिक मतदान
Maximum temperature drops in Mumbai
मुंबईच्या कमाल तापमानात घट
mumbai restaurants and shopkeepers offer discounts to voters
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मतदान करणाऱ्यांवर आकर्षक सवलतींचा पाऊस
bmc workers union misused signature for maha vikas aghadi
पालिकेतील कामगार संघटनाच्या समन्वय समितीने केला स्वाक्षरीचा दुरुपयोग; आघाडीला परस्पर पाठिंबा जाहीर केल्यामुळे अन्य संघटना नाराज
maharashtra weather forecast for the week cold in nashik
नाशिक गारठले; जाणून घ्या, आठवडभराचा थंडीचा अंदाज
Mumbai Exit polls
Mumbai Exit Polls Update : मुंबईत आवाज कुणाचा? महायुतीची गर्जना की मविआची डरकाळी? एक्झिट पोलचे अंदाज वाचा!

हेही वाचा : मतदानाचा टक्का जैसे थे, सरासरी ६० टक्के प्रतिसाद; ग्रामीण भागात उत्साह, शहरवासी उदासीनच

मुस्लिमबहुल भागात तुलनेने अधिक मतदान

लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत निवडणूक आयोगाने मतदान केंद्रांची संख्या वाढविल्याने शहर व उपनगरातील काही भागांमध्ये मतदानासाठी मोठ्या रांगा लागण्याचे प्रमाण तुलनेने कमी होते. असे असले, तरी मुंबई महानगर प्रदेशामध्ये यावेळीही निरुत्साहाचे वातावरण कायम होते. मुंबई शहर, उपनगर आणि ठाणे जिल्ह्यांत ५० ते ५५ टक्क्यांच्या आसपास मतदान झाले. त्या तुलनेत शहराच्या मुस्लिमबहुल भागांमध्ये मतदानाचा जोर दिसून आला.

लोकसभा निवडणुकीत सुमारे दीड हजार मतदारांमागे एक मतदान केंद्र होते. यावेळी एक हजार ते बाराशे मतदारांमागे केंद्र देण्यात आल्यामुळे लांब रांगा लागल्याचे दृष्य फारसे दिसले नाही. सकाळपासून ११ वाजेपर्यंत मतदारांची ये-जा सुरु असली मोठ्या रांगा नव्हत्या. आयोगाने आदेश दिल्याने बहुतांश केंद्रांवर मतदारांना बसण्यासाठी खुर्च्या व बाकड्यांची आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र रांगा (पान ८ वर) (पान १ वरून) तुरळकच असल्याने खुर्च्या रिकाम्याच होत्या. अनेक ठिकाणी मतदारांना केंद्राच्या आवारात शिरतानाच मोबाईल बंद करण्याच्या सूचना देण्यात येत होत्या. मतदान कक्षात बंदी असताना आवारात शिरतानाच मोबाईल बंद करण्यावरून पोलिस आणि मतदारांमध्ये वादावादीचे प्रकार घडले.

हेही वाचा : मतदानोत्तर चाचण्या गोंधळलेल्या, विविध संस्थांच्या अंदाजांत विसंगती

s

मुलुंड, भांडुप, कांजुरमार्ग, विक्रोळी, पवई, घाटकोपर, माहीम आदी भागातील अनेक मतदान केंद्रांमध्ये दुपारपर्यंत मतदानाचे प्रमाण २५-२७ टक्क्यांपर्यंत होते. शिवसेना शिंदे व ठाकरे गट, भाजप आदी पक्षांच्या मतदान केंद्रांजवळील टेबलांवर कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. मात्र बहुतांश मतदारांना ऑनलाईन पद्धतीने आणि उमेदवारांकडून आधीच मतदान केंद्र, यादी क्रमांक आदी तपशील मिळाला असल्याने या टेबलांवरही मतदारांची गर्दी फारशी नव्हती. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक आयोग, राजकीय पक्षांचे नेते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी जनतेला आवाहन केले असतानाही लोकसभेच्या तुलनेत मतदानाचे प्रमाण खूप वाढले असल्याचे चित्र नव्हते. चांदिवली, जोगेश्वरी, फिल्टरपाडा, आग्रीपाडा, पठाणवाडी, नागपाडा आदी मुस्लिमबहुल परिसरातील केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. त्यात ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाणही मोठे होते. भायखळ्यातील सुशांती चर्च प्राथमिक शाळा, महापालिकेच्या वाहनतळातील मतदान केंद्रावर हेच चित्र दिसत होते.

उपाययोजनांना उपनगरांत अल्प यश

मुंबई शहराच्या तुलनेत उपनगरांमधील मतदान काहीसे वाढले. लोकसभेला मुंबई जिल्ह्यात ५१.३६ तर उपनगर जिल्ह्यात ५४.९७ मतदान झाले होते. यावेळी उपनगर जिल्ह्यात अखेरचे वृत्त हाती आले तोपर्यंत ५६ टक्के मतदान झाले होते. यात सर्वाधिक ६२ टक्के मतदान भांडूप पश्चिम मतदारसंघात झाले असून बोरीवली आणि मुलुंडमध्येही ६१ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. चांदिवलीमध्ये सर्वात कमी ४८ टक्के मतदान झाले आहे. मुंबई शहर जिल्हयात वडाळा मतदारसंघात सर्वाधिक ५८ टक्के तर कुलाब्यात सर्वांत कमी ४५ टक्के मतदान झाले.