मुंबई : लोकसभा आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या वेळी विविध वृत्तवाहिन्या आणि संस्थांचे अंदाज साफ चुकले असताना राज्य विधानसभा निवडणुकीतही विविध संस्थांनी संमिश्र अंदाज वर्तविले आहेत. काही संस्थांनी महायुती आणि महाविकास आघाडीत फार अंतर नसेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. रिंगणातील सहा पक्ष, छोटे पक्ष तसेच बंडखोरांमुळे नेमके चित्र स्पष्ट होत नाही.

विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडताच विविध संस्थांच्या मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले. लोकसभा निवडणुकीत बहुतेक संस्थांनी भाजपला ३०० ते ३५० जागा मिळतील, असा अंदाज वर्तविला होता. प्रत्यक्षात भाजपला २४० जागा मिळाल्या. नुकत्याच पार पडलेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत सत्ताबदल होऊन काँग्रेस सत्तेत येईल, असा अंदाज बहुतेक सर्वच मतदानोत्तर चाचण्यांमध्ये वर्तविण्यात आला होता. प्रत्यक्षात भाजपने हरियाणाची सत्ता कायम राखली.

supriya sule bitcoin scam
‘बिटकॉइन’प्रकरणी छत्तीसगडमध्ये छापे, कथित घोटाळ्याचे राजकीय लागेबांधे असल्याचा ‘ईडी’ला संशय
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Adani Group Chairman Gautam Adani Fraud Bribery Case News in Marathi
Gautam Adani Fraud: गौतम अदाणी, पुतण्या सागर अदाणी यांनी कंत्राट मिळविण्यासाठी २,००० कोटी रुपयांची लाच दिली; अमेरिकेत दोषारोप
What Exit Polls Prediction About Raj Thackeray?
Maharashtra Exit Poll 2024 : राज ठाकरे किंगमेकर ठरणार? काय आहे एक्झिट पोल्सचा अंदाज?
voter turnout Maharashtra
मतदानाचा टक्का जैसे थे, सरासरी ६० टक्के प्रतिसाद; ग्रामीण भागात उत्साह, शहरवासी उदासीनच
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
Jharkhand exit polls
झारखंडमध्ये सत्तांतर? मतदानोत्तर चाचण्यांमध्ये भाजपची सत्ता येण्याचा अंदाज
Maharashtra Assembly Election 2024 Mahayuti Mahavikas Aghadi final Seat Sharing Formula
Maharashtra Assembly Election 2024 : महायुती व महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला! सहा पक्षांकडून इतके उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

हेही वाचा : ‘बिटकॉइन’प्रकरणी छत्तीसगडमध्ये छापे, कथित घोटाळ्याचे राजकीय लागेबांधे असल्याचा ‘ईडी’ला संशय

‘चाणक्य’ने महायुतीला १५२ ते १६०, ‘मार्टिझ’ने महायुतीला १५० ते १७०, ‘पीपल्स पल्स’ने १७५ ते १९५ जागा महायुतीला मिळतील, असा अंदाज व्यक्त केला आहे. ‘पोल डायरी’ या नवख्या संस्थेने महायुतीला १२२ ते १८६ जागा, तर महाविकास आघाडीला ६९ ते १२१ जागांचा अंदाज व्यक्त केला होता. आता १२२ ते १८६ एवढे अंतर कसे? लोकशाही मराठी – रुद्राने महायुतीला १२८ ते १४२, तर महाविकास आघाडीला १२५ ते १४० जागांचा अंदाज व्यक्त केला आहे.

हेही वाचा : मुंबईच्या काही भागांमध्ये निरुत्साह, मुस्लीमबहुल भागात तुलनेने अधिक मतदान

इलेक्टोरल एजने महाविकास आघाडीला १४० ते १५०, तर महायुतीला ११७ ते ११८ जागांचा अंदाज वर्तविला आहे. ‘एसएएस हैदराबाद’ या संस्थेच्या मतदानोत्तर चाचणीत महाविकास आघाडीला १४७ ते १५५, तर महायुतीला १२७ ते १३५ जागांचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ‘दैनिक भास्कर’ने महाविकास आघाडीला १३५ ते १५०, तर महायुतीला १२५ ते १४० तर ‘टाइम्स नाऊ’ने महायुतीला १५८-१५९, तर महाविकास आघाडीला ११५-११६ जागांचा अंदाज वर्तविला आहे. एकूणच सर्व अंदाजांवर नजर टाकल्यास संमिश्र कौल दिसतो. लोकसभा आणि हरियाणा निवडणुकीच्या वेळी सर्वच मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज चुकल्याने महाराष्ट्र आणि झारखंडच्या मतदानोत्तर चाचण्या कितपत विश्वासार्ह, हा प्रश्न उपस्थित होतो.

महायुतीमविआइतर
मॅट्राईज१५० ते १७०११० ते १३०८ ते १०
पीपल्स प्लस१७५ ते १९५८५ ते ११२७ ते १२
चाणक्य स्ट्रॅटजीज१५२ ते १६०१३० ते १३८६ ते ८
पीमार्ग१३७ ते १५७१२६ ते १४६२८
पोल डायरी१२२ ते १८६६९ ते १२११२ ते २९
लोकशाही मराठी रुद्रा१२८ ते १४२१२५ ते १४०१८ ते २३
एकूण जागा २८८