मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मुंबई शहर आणि उपनगरातील मुख्य रस्ता, नाका आणि चौकाचौकांतील महाकाय राजकीय फलकबाजी नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरली आहे. महाकाय फलकांवरील काही ओळींच्या मजकुरातून कामाचा अहवाल मांडला आहे. शिवाय पक्षांनी एकमेकांविरोधात अप्रत्यक्षरित्या टोलेबाजीही केली आहे.

राजकीय पक्षांनी विविध विकासकामांचे श्रेय घेण्यास सुरुवात केली आहे. भाजपच्या फलकांवरील ‘भाजप-महायुती आहे तर गती आहे; महाराष्ट्राची प्रगती आहे’, तर शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या फलकांवरील ‘ज्याने कठीण काळात धार्मिक आणि जातीय सलोखा जपला, तो खरा नेता – संकटकाळी मदतीला येतो, तो खरा नेता’ असा आशय मतदारांपर्यंत पोहोचवला आहे.

Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
bombay hc reject builder bail over illegal housing projects
बेकायदा गृहप्रकल्प राबवणाऱ्यांवर कारवाई गरजेची; विकासकांना जामीन नाकारताना उच्च न्यायालयाची टिप्पणी
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
Narendra modi BHIM UPI Babasaheb Ambedkar
“BHIM UPI चं नाव बाबासाहेबांच्या नावावर”, मोदींचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेने खोडून काढला? पुरावा देत म्हणाले…
NCP Clock
NCP Clock Symbol : ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना आदेश; पक्षचिन्हाबाबत दिला ३६ तासांचा अल्टिमेटम!
Bullet Train Bridge Collapse in Anand Gujarat
Bullet Train Bridge Collapse : बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पूल कोसळला, तीन मजूर ठार; ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले, बचावकार्य जारी
stepfather rape daughter
मुंबई: अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या, मानखुर्दमधील धक्कादायक घटना

यंदा विधानसभा निवडणुकीत ‘महायुती’विरुद्ध ‘महाविकास आघाडी’ अशी लढत आहे. राजकीय पक्षांचे उमेदवार विधानसभा मतदारसंघांतील घरोघरी जाऊन संवाद साधण्यावर भर देत आहेत, तर मुख्य नेत्यांच्या प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. या धामधुमीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी मुंबईतील महामार्ग आणि मुख्य रस्त्यांवरील विविध राजकीय पक्षांचे महाकाय फलक चर्चेचा विषय ठरले आहेत. यात महाकाय डिजिटल फलकांचाही समावेश आहे.

वरळीतील धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी मार्ग परिसरात या प्रकल्पाचा उल्लेख करत श्रेयवादासाठी चढाओढ पाहायला मिळत आहे. भाजपच्या फलकांवर ‘धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी मार्गाचे मुंबईच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवला’ आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या फलकांवर ‘ज्याने करोना काळात अटल सेतू, मेट्रो आणि समुद्री महामार्गाचे काम सुरू ठेवले, तो खरा नेता – संकटकाळी मदतीला येतो, तो खरा नेता’ असा मजकूर प्रसिद्ध केला आहे. अनेक ठिकाणी भाजप व शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे फलक हे जवळपास लागलेले पाहायला मिळत आहेत.

हे ही वाचा… Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : ईडीच्या दबावामुळे भुजबळांना भाजपात जावं लागलं? बावनकुळे म्हणाले, “त्यांनी मला सांगितलं…

फलकांवर प्रचार

राजकीय पक्षांनी सत्तेत असताना केलेली विकासकामे आणि योजनांचा आवर्जून उल्लेख केला आहे. भाजपच्या फलकांवर ‘घरगुती बचतीला आधार; वर्षाला ३ मोफत सिलिंडर’, ‘उद्याोगांना छळणारे नाही; ५२ टक्के परकीय गुंतवणूक आणणारे सरकार, रोजगारनिर्मिती होणार’, शिवसेना शिंदे गटाच्या फलकांवर ‘केलंय काम भारी. . .; आता पुढची तयारी’, ‘एक रुपयात पीक विम्याची; योजना बळीराजाच्या सुरक्षेची’, ‘विकासाचं निशाण. . . लाडकं धनुष्यबाण’, शिवसेना ठाकरे गटाच्या फलकांवर ‘ज्याने शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्ती दिली; तो खरा नेता’ असा मजकूर लिहून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

मनसेच्या फलकांवर अस्मिता

राज्यात ‘महायुती’ विरुद्ध ‘महाविकास आघाडी’ अशी थेट लढत होत आहे, मात्र, या रणांगणात राज ठाकरे यांची महारार्ष्ट्र नवनिर्माण सेना स्वबळावर उतरली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी मनसेनेही कंबर कसली आहे. मनसेच्या महाकाय फलकांवर प्रामुख्याने महाराष्ट्राची अस्मिता आणि शिवरायांचा उल्लेख करण्यात आला आहे. ‘माझ्या शिवछत्रपतींचं फर्मान; महाराष्ट्राचं नवनिर्माण’, ‘लढणारा महाराष्ट्र होऊ; घरात बसणारा नाही ! पोसणारा महाराष्ट्र होऊ, अन्याय सोसणारा नाही!’ असा मजकूर लिहिण्यात आला आहे.

Story img Loader