मुंबई : बीड जिह्यात मतदान केंद्रात तोडफोड, काही ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड तसेच प्रतिस्पर्धी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांमध्ये संघर्षाच्या किरकोळ घटनांचा अपवाद वगळता विधानसभेच्या २८८ जागांसाठी बुधवारी राज्यात शांततेत मतदान पार पडले. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी आयोगाने राबविलेल्या विविध उपाययोजनांनंतरही शहरी भागातील मतदारांचा निरुत्साह पुन्हा एकदा दिसून आला असून ग्रामीण भागातील मतदारांच्या उत्साहामुळे राज्यात सरासरी ६० -६२ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

लोकसभा निवडणुकीत राज्यात सरासरी ६१ टक्के मतदान झाले होते. तर सन २०१९च्या विधानसभा निवडणुकीत ६१.४ टक्के मतदान झाले होते. लोकसभा निवडणुकीत ग्रामीण भागात चांगले मतदान झाले होते. तर शहरी भागात मतदारांमधील निरुत्साह दिसून आला होता. त्यानंतर शहरी भागातील विशेषत: मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर या शहरांमधील मतदानाची टक्केवारी वाढावी, मतदारांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी आयोगाने जनजागृतीसह विविध उपायोजना केल्या होत्या. मात्र आयोगाच्या या उपाययोजनानंतरही मतदानच्या टक्केवारीत फारसा फरक पडलेला नाही. राज्यातील अकोला, मालेगाव, जळगाव, छत्रपती संभाजी नगर, कोल्हापूर, नाशिक आदी जिह्यांतील काही मतदान केंद्रांवर मतदान यंत्रात बिघाड झाल्यामुळे काही काळ मतदान थांबले होते. शेवटच्या दोन तासांत मतदानाने वेग घेतला. त्यामुळे हे मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार याची उत्सुकता आहे.

Congress List for delhi assembly Election
Delhi Election : आता दिल्ली विधानसभेची धूम! काँग्रेसने जाहीर केली २१ उमेदवारांची यादी, अरविंद केजरीवालांसमोर तगडा उमेदवार!
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्रीपदी निवड करताना पडद्यामागे काय घडलं? बावनकुळे म्हणाले... (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्रीपदी निवड करताना पडद्यामागे काय घडलं?
Rahul Narwekar
Rahul Narwekar : संख्याबळ नाही तरीही मविआला विरोधी पक्षनेतेपद देणार का? राहुल नार्वेकरांनी स्पष्टच सांगितलं
Ravindra Waikar And Amol Kirtikar
Ravindra Waikar : रवींद्र वायकरांची खासदारकी जाणार की राहणार? मुंबई उच्च न्यायालयाने राखून ठेवला निर्णय
महायुतीला मिळालेली मते आणि जिंकलेल्या जागांमध्ये खरंच तफावत आहे का? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : महायुतीला मिळालेली मते आणि जिंकलेल्या जागांमध्ये खरंच तफावत आहे का?
Mahavikas Aghadi News
विरोधी पक्षनेते पदावरून महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच?
jayant patil rahul narvekar
Video: “राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर सर्वोच्च न्यायालय अजून विचार करतंय”, जयंत पाटील यांची टोलेबाजी!

हेही वाचा : ‘बिटकॉइन’प्रकरणी छत्तीसगडमध्ये छापे, कथित घोटाळ्याचे राजकीय लागेबांधे असल्याचा ‘ईडी’ला संशय

बीडमध्ये मतदान केंद्रात तोडफोड

बीड जिल्हयातील परळी विधानसभा मतदारसंघात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील उमेदवारांच्या समर्थकांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर संतप्त कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रात घुसून तोडफोड केल्याच्या घटनेचा अपवाद वगळता राज्यात सर्वत्र शांततेत मतदान पार पडल्याची माहिती आयोगातील सूत्रांनी दिली.

गडचिरोलीत सर्वाधिक

ग्रामीण भागातील मतदारांनी या वेळीही उत्साहात मतदान केले असून गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक ७० टक्के मतदान झाले असून त्या खालोखाल कोल्हापूर, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, सांगली, वर्धा, यवतमाळ, सातारा जिह्यात सरासरी ६५ ते ७० टक्के दरम्यान मतदान झाले आहे. तर ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, पुणे, नांदेड, नागपूर, अकोला जिल्ह्यात ५० ते ५५ टक्क्यांपर्यंत मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे आयोगातील सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा : मुंबईच्या काही भागांमध्ये निरुत्साह, मुस्लीमबहुल भागात तुलनेने अधिक मतदान

अपक्ष उमेदवाराचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : बीड मतदारसंघातील अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे (४०) यांचा मतदान केंद्रावरच हृदयविकाराने मृत्यू झाला. शिंदे सकाळी छत्रपती शाहू विद्यालयातील मतदान केंद्रांवर आले असताना त्यांना भोवळ आली. त्यांना आधी शहरातील आणि नंतर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

Story img Loader