पीटीआय, मुंबई
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या काळात कथितरीत्या बिटकॉइन व्यवहार झाल्याच्या आरोपावरून छत्तीसगडमध्ये सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी छापा टाकला. सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांच्यावर भाजपने याबाबत आरोप केल्याच्या दुसऱ्याच दिवशी ही कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, केंद्रीय अन्वेषण विभागानेही (सीबीआय) कूटचलन घोटाळा प्रकरणी गौरव मेहताला समन्स बजावले आहे. गेन बिटकॉइन फसव्या योजनेचे विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल गुन्हे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गतवर्षी डिसेंबरमध्ये सीबीआयकडे हस्तांतरित करण्यात आले होते. मेहता याला लवकरात लवकर चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश सीबीआयने दिले आहेत.

muslim majority areas voting
मुंबईच्या काही भागांमध्ये निरुत्साह, मुस्लीमबहुल भागात तुलनेने अधिक मतदान
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Jharkhand exit polls
झारखंडमध्ये सत्तांतर? मतदानोत्तर चाचण्यांमध्ये भाजपची सत्ता येण्याचा अंदाज
Gautam Adani fraud charge
गौतम अदाणी, पुतण्या सागर अदाणी यांनी कंत्राट मिळविण्यासाठी २,००० कोटी रुपयांची लाच दिली; अमेरिकेत दोषारोप
What Exit Polls Prediction About Raj Thackeray?
Maharashtra Exit Poll 2024 : राज ठाकरे किंगमेकर ठरणार? काय आहे एक्झिट पोल्सचा अंदाज?
north maharashtra politic
उत्तर महाराष्ट्र : जातीय धार्मिक मुद्द्यांवरच प्रचार केंद्रित
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
maharashtra vidhan sabha election 2024 exit polls result
मतदानोत्तर चाचण्या गोंधळलेल्या, विविध संस्थांच्या अंदाजांत विसंगती

हेही वाचा : मुंबईच्या काही भागांमध्ये निरुत्साह, मुस्लीमबहुल भागात तुलनेने अधिक मतदान

मंगळवारी भाजपने राष्ट्रवादी (शरद पवार) (पान ८ वर) (पान १ वरून) खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची एक कथित ध्वनिफीत जारी केली. २०१८ साली बिटकॉइन घोटाळ्यात अटक झालेले माजी पोलीस अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांनी एका लेखापरीक्षण कंपनीमध्ये कर्मचारी असलेल्या गौरव मेहता नामक व्यक्तीने आपल्याला अशा १० ध्वनिफिती दिल्याचा दावा केला आहे. बुधवारी ईडीने मेहता यांच्या रायपूरमधील घरावर छापा टाकल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. सुळे, पटोले यांच्यासह पुण्याचे माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, माजी उपअधीक्षक भाग्यश्री नवटाके यांच्या ध्वनिफिती असल्याचेही पाटील यांचे म्हणणे आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कथित बिटकॉइन घोटाळ्याच्या तपासाची व्याप्ती वाढविताना ईडीने बुधवारी मेहताच्या घराची झडती घेतली. मेहताचे काही राजकीय नेते, सरकारी अधिकारी आणि राजकीय प्रभाव असलेल्या व्यक्तींबरोबर लागेबांधे असल्याचा तपास यंत्रणेला संशय आहे. मेहताकडे आताही शेकडो कोटींचे मूल्य असलेले अनधिकृत बिटकॉइन असल्याची शंका पाटील यांनी निवडणूक आयोगाला केलेल्या तक्रारीत व्यक्त करण्यात आली आहे.

हेही वाचा : मुंबईच्या कमाल तापमानात घट

सुळे यांनी आरोप फेटाळले

पुणे : भाजपकडून प्रसारित करण्यात आलेल्या ‘बिटकॉइन’ संबंधीच्या कथित ध्वनिफीतीतील आवाज आपला आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा नसून हे आवाज कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे (एआय) तयार करण्यात आल्याचा दावा राष्ट्रवादी (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. यासंदर्भात करण्यात आलेल आरोप फेटाळतानाच हे आरोप करणाऱ्यांना कायदेशीर नोटीस बजावली असून चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.