मुंबई : ‘फेंगल’ चक्रीवादळामुळे राज्याच्या दक्षिणेकडील भागात बाष्पयुक्त वारे आल्यामुळे ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवस हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ‘फेंगल’ चक्रीवादळामुळे राज्याच्या दक्षिण भागात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांना पावसासाठी पिवळा इशारा दिला आहे. या जिल्ह्यांत मेधगर्जना, विजांच्या कडकडाटासह ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहून पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

हेही वाचा : महापरिनिर्वाण दिनानिमित्त पिंक टॉयलेट, हिरकणी कक्ष, अतिरिक्त शौचायलांची सुविधा

‘फेंगल’ने थंडी घालवली

बंगालच्या उपसागरात तयार झालेले आणि तमिळनाडूच्या किनारपट्टीवर धडकलेल्या फेंगल चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली आहे. चक्रीवादळाने अरबी समुद्रात प्रवेश केल्यानंतरही त्याची तीव्रता वाढलेली नाही. त्यामुळे प्रामुख्याने महाराष्ट्रावर त्याचा विशेष परिणाम जाणवला नाही. पण, राज्याच्या बहुतांश भागांत ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे राज्यातील थंडी फेंगल चक्रीवादळाने घालवली आहे. पुढील आठवडाभर राज्यभरात थंडीत फारशी वाढ होणार नाही. कमाल – किमान तापमान स्थिर राहील, असा अंदाज हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी वर्तविला केला आहे.

हेही वाचा : बाबा सिद्धीकी हत्या प्रकरण: लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या महत्त्वाच्या गुंडाचा सहभागाचा संशय

द्राक्ष बागायतदार धास्तावला

सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यांत द्राक्ष बागांचे क्षेत्र मोठे आहे. या जिल्ह्यांतील बहुतांश द्राक्षबागा आता फुलोऱ्यात आहेत. फुलोऱ्यात असताना पाऊस झाल्यास फळकुज होते, बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढून द्राक्ष बागांचे आतोनात नुकसान होते. त्यामुळे ढगाळ हवामान आणि पावसाच्या शक्यतेमुळे द्राक्ष बागायतदार धास्तावला आहे. पण, हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाल्यास रब्बी हंगामात लागवड झालेल्या पिकांना हा पाऊस फायदेशीर ठरणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra weather updates south konkan central maharashtra chances of heavy rain and winter mumbai print news css