उन्हाळ्याची चाहुल लागत असताना महाराष्ट्राला केंद्रीय कोटय़ातून मिळणाऱ्या वीजेत १३५ मेगाव्ॉटची भर पडली आहे. त्याचवेळी तिरोडा येथील अदानी पॉवरचा ६६० मेगावॅटचा वीजनिर्मिती संच कार्यान्वित झाल्याने मार्चअखेपर्यंत राज्याला एकूण सुमारे ८०० मेगाव्ॉट जादा वीज उपलब्ध होणार आहे.
राज्याची वीजेची गरज सध्या साडेचौदा हजार मेगाव्ॉट असून उपलब्धता सरासरी १४ हजार मेगाव्ॉटच्या आसपास आहे. त्यामुळे ५०० मेगाव्ॉटची तूट भासत आहे. वाढत्या उन्हाबरोबरच वीजेची मागणी वाढत असते. आता राज्यभर उन्हाळ्याची चाहुल लागण्यास सुरूवात लागली आहे. त्यामुळे एप्रिल-मे महिन्यात वीजेच्या मागणीत आणखी ५०० ते १००० मेगाव्ॉटची वाढ होण्याची शक्यता आहे. या पाश्र्वभूमीवर ‘राष्ट्रीय औष्णिक वीज महामंडळा’च्या विंध्याचल येथील ५०० मेगाव्ॉटचा वीजनिर्मिती संच सुरू झाला आहे. यात महाराष्ट्राचा वाटा १३५ मेगाव्ॉटचा आहे. तसेच, तिरोडा येथील अदानी पॉवरचा ६६० मेगाव्ॉटचा संच कार्यान्वित झाला आहे. दोन ते तीन आठवडय़ात त्यातून पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती सुरू होईल. त्यामुळे उन्हाळ्याच्या तोंडावर राज्याच्या वीजेच्या उपलब्धतेत सुमारे ८०० मेगाव्ॉटची भर पडेल. वीजेच्या उपलब्धतेत वाढ झाल्याने भारनियमन नियंत्रणात ठेवणे शक्य होईल. विंध्याचल प्रकल्पातील १३५ मेगाव्ॉट वीज ही प्रतियुनिट दोन रुपये ९० पैसे या दराने तर अदानीची वीज प्रतियुनिट पावणेतीन रुपये दराने मिळेल.

Story img Loader