मुंबई : गृहनिर्माण प्रकल्पात विकासकांना आता यापुढे ज्येष्ठ नागरिकांचा विचार करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊनच प्रकल्पाची, इमारतीची रचना, बांधकाम करणे विकासकांना आवश्यक असणार आहे. महारेराने यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार ज्येष्ठांचा विचार करून प्रकल्पात काय असावे यासंबंधीच्या मार्गदर्शक तत्त्वाचा मसुदा महारेराने जाहीर केला आहे. या निर्णयाची लवकरच अमलबजावणी होणार आहे.

हेही वाचा >>> महिलांच्या हितासाठी कौटुंबिक अत्याचाराचे ४९८ ए कलम दंडात्मक करू शकत नाही, भूमिकेचा केंद्र सरकारतर्फे उच्च न्यायालयात पुनरूच्चार

loksatta satire article on uddhav thackeray chopper checking
उलटा चष्मा : तपासण्यांची उड्डाणे
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
investors of DSK, Maval-Mulshi sub-divisional magistrate, Court, DSK,
‘डीएसके’ यांच्या गुंतवणूकदारांची यादी सादर करण्याचे मावळ-मुळशी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना न्यायालयाचे आदेश
article 344 commission and committee of parliament on official language
संविधानभान : भाषिक संतुलनाचा विचार
nirmala sitharaman to meet states finance ministers for budget preparation
निर्मला सीतारामन अर्थसंकल्पाच्या तयारीला, राज्यांच्या अर्थमंत्र्यांची भेट घेणार! जीएसटी परिषदेच्या बैठकीपूर्वी मसलतही विषयपत्रिकेवर
RBI announces changes to KYC rules! How it will impact you
KYC : RBI ने केली KYC नियम बदलण्याची घोषणा, आपल्यावर नेमका कसा परिणाम होणार?
bombay high court slams bmc officer over cm order
मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला महत्व नाही का? उच्च न्यायालयाची महापालिका प्रशासानाला विचारणा
indian-constituation
संविधानभान: जातनिहाय जनगणनेची आवश्यकता

सेवानिवृत्तीनंतर अनेक जण गावी वा निसर्गरम्य ठिकाणी जाऊन शांततेत आयुष्य जगण्याचा निर्णय घेतात. हीच बाब लक्षात घेत विकासक विविध ठिकाणी खास ज्येष्ठांसाठी, सेवानिवृत्त नागरिकांसाठी घरे बांधतात, प्रकल्प राबवितात. मात्र अनेकदा ज्येष्ठांच्या गरजा लक्षात न घेत प्रकल्प उभारले जात असल्याचे महारेराच्या निदर्शनास आले असून महारेराने याची गंभीर दखल घेतली आहे. ज्येष्ठांचे प्रकल्प कसे असावेत यासाठी केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाने आदर्श मार्गदर्शक तत्वे यापूर्वीच जारी केली आहेत. राज्यांच्या विनियामकांनी त्यांच्या राज्यात याबाबत उचित पावले उचलावी असे त्यांनी सुचविले आहे. यानुसार महारेराने यात ज्येष्ठांच्या गरजांनुसार  इमारतींशी संबंधित सर्वच अंगांचा सांगोपांग विचार करून तरतुदी सुचविल्या आहेत. विकासकाकडून होणारी ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक रोखण्यासाठी महारेराने मार्गदर्शक तत्वे तयार केली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांचा मसुदा जाहीर केला आहे.

हेही वाचा >>> Video: “मंत्रालयात गुंडांकडून रील्सचं शूटिंग”, विजय वडेट्टीवारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल; म्हणाले, “हीच का मोदी की गॅरंटी?”

या मसुद्याबाबतच्या सूचना-हरकती २९ फेब्रुवारीपर्यँत सादर करता येणार आहेत. त्यानंतर या सूचना- हरकतींचा विचॅट करून अंतिम आदेश जारी केले जाणार आहेत. आदेश लागू झाल्यानंतर विकासकांना या तरतुदींचा विक्रीकरारात योग्य पध्दतीने समावेश करावा लागेल. हे विशिष्ट प्रकल्प या आदर्श मार्गदर्शक तत्त्वानुसारच बांधावे लागतील. इमारतीचे संकल्पचित्र,  हरित इमारत तत्वे , उद्वाहन आणि रॅम्पस, जिना, अनेक सदनिकांना जोडणारा छिन्नमार्ग,  प्रकाश योजना आणि हवा खेळती ठेवण्यासाठी वायुवीजन सुरक्षा आणि सुरक्षितता याबाबत कुठल्या बाबतीत कशी काळजी घ्यावी, याचे स्पष्ट मार्गदर्शन मसुद्यात करण्यात आले आहे. जेष्ठ नागरिक या गृहनिर्माण प्रकल्पात प्रत्यक्षात राहायला गेल्यानंतर त्यांना अपेक्षित  सोयी-सुविधा उपलब्ध असाव्यात, हा महारेराचा हेतू आहे. सेवानिवृत्त आणि ज्येष्ठांसाठीच्या गृहनिर्माण प्रकल्पांसाठी विनियामक तरतुदी करण्याबाबत पुढाकार घेणारे महारेरा हे पहिलेच प्राधिकरण आहे.

यातील काही महत्त्वाच्या तरतुदी अशा…

* एका मजल्यापेक्षा जास्त मजल्याच्या इमारतीला लिफ्ट असावी.

* इमारतीच्या आतील आणि बाहेरील भागात व्हीलचेअरवर कुठल्याही अडथळ्याशिवाय फिरेल असे आरेखन असावे.

* आवश्यक तेथे रॅम्पसची व्यवस्था असावी, त्यादृष्टीने दरवाजेही ९०० एमएमपेक्षा मोठे असावे. प्राधान्याने स्लायडिंगचे दरवाजे असल्यास उत्तमच.

* दरवाज्याचे हँडल्स, कड्या सहजपणे व्यवस्थित पकडता येतील असे आणि दणकट असावे. यातील फर्निचरही वजनाला हलके, दणकट आणि कुठल्याही अणकुचीदार टोकांशिवाय असावे.

* सर्व लिफ्टला द्रृकश्रव्य व्यवस्था असावी. या लिफ्टमध्ये व्हीलचेअर  सहजपणे आत-बाहेर करता यावी.

* जिन्यांची रुंदी १५०० एमएमपेक्षा कमी नसावी. शिवाय जिन्याच्या दोन्ही बाजूला हँडल्स असावे. पूर्ण उघडा आणि वर्तुळाकार जिना असू नये.

* दोन पायऱ्यांमधील अंतरही फार असू नये. जिनाही १२ पायऱ्यांपेक्षा मोठा असता कामा नये.

*  इमारतीच्या कॉरिडॉरमध्ये कुठेही पायऱ्या असू नये. खूपच गरज असेल तर रॅम्पसची व्यवस्थाही असावी.

जेथे जेथे छिन्नमार्गाच्या पातळीत फरक असेल तो भाग सहजपणे लक्षात येईल अशा ठळक रंगाने दाखवावा.

* भिंतीलगत  गरजेनुसार विशिष्ट उंचीवर  हँडल्सही असावेत .

* स्वयंपाकघरात गॅस प्रतीरोधक यंत्रणा असावी.

* स्नानगृहात सहजपणे पकडता येईल अशा हँडल्ससह वाश बेसीन असावे. हँडल्स दणकट असावेत. न घसरणाऱ्या टाईल्स असाव्यात. शौचालयाचा दरवाजा बाहेर उघडणारा असावा.

* विजेची पर्यायी व्यवस्था असावी.