मुंबई: महारेराचे संकेतस्थळ अद्यावत करण्यात आले असून नवीन संकेतस्थळ १ सप्टेंबरपासून कार्यान्वित होणार आहे. महाकृती नावाने ओळखल्या जाणाऱ्या या संकेतस्थळाच्या वापराबाबतचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय महारेराने घेतला आहे. त्यानुसार विकासक, तक्रारदार, विकासक आणि तक्रारदारांचे वकील तसेच इतर वापरकर्त्यांना संकेतस्थळ वापराबाबतचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. संकेतस्थळ कार्यान्वित होण्याआधी आणि संकेतस्थळ कार्यान्वित झाल्यानंतर हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

महारेरा कायद्याअंतर्गत विकासकांना, दलालांना नोंदणी करण्यासाठी संकेतस्थळाचा वापर करावा लागतो. तर विकासकांना प्रत्येक गृह प्रकल्पाची नोंदणी संकेतस्थळाअंतर्गतच करावी लागते. त्याचवेळी तक्रारदार आणि इतर नागरिकांनाही संकेतस्थळाद्वारे आपल्या समस्या, तक्रारी मांडून त्याचे निराकरण करून घेता येते. तर महारेरा कायद्यासंदर्भातील इत्यंभूत माहितीही महारेराच्या संकेतस्थळावरच उपलब्ध असते. महारेराकडून आपले आदेश, निकालही ऑनलाईन पद्धतीने संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जातात. एकूणच महारेराचे संकेतस्थळ अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.  हे संकेतस्थळ अद्यावत करण्याची गरज भासल्याने महारेराने नवीन संकेतस्थळ तयार करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महाकृती नावाने नवीन संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. हे संकेतस्थळ १ सप्टेंबरपासून कार्यान्वित होणार आहे.

हेही वाचा >>>Mumbai Local : तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वे विस्कळीत

या संकेतस्थळाच्या प्रभावी वापराकरीता विकासक, प्रवर्तक ग्राहक, विकासक आणि  तक्रादारांचे वकील आदींना संकेतस्थळ वापराबाबतचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय महारेराने घेतला आहे. संकेतस्थळ कार्यान्वित होण्याआधी म्हणजेच २९ आणि ३० ऑगस्टला प्रशिक्षण दिले जाणार आहे. तर संकेतस्थळ कार्यान्वित झाल्यानंतर अर्थात १ सप्टेंबरनंतर दोन आठवड्यांसाठी प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती महारेराकडून देण्यात आली. २९ आणि ३० ऑगस्ट रोजी विकास, दलाल, प्रवर्तक ,गृहनिर्माण सोसायट्याच्या पदाधिकाऱ्यांना, तर १ सप्टेंबरनंतर तक्रारदारांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

प्रत्यक्ष आणि दृकश्राव्य पद्धतीने हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे या प्रशिक्षणाद्वारे विकासक –  दलालांनी नोंदणी कशी करावी, गृहप्रकल्पाची नोंदणी कशी करावी, तक्रारी कशा सादर कराव्यात यासह अन्य प्रकारची माहिती दिली जाणार आहे. या प्रशिक्षणात अधिकाधिक विकासक आणि नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महारेराकडून करण्यात आले आहे.